भारतात दाखल झालेली राफेल लढाऊ विमाने म्हणजे ‘गेम चेंजर’ - केंद्रीय गृह मंत्री अमित शाह
राफेल दाखल होण्याचा दिवस आपल्या भारतीय हवाई दलासाठी ऐतिहासिक दिवस आणि भारतासाठी अभिमानाचा क्षण -अमित शहा


स्थैर्य, नवी दिल्ली, 29 : भारतीय भूमीवर दाखल  झालेली राफेल लढाऊ विमाने म्हणजे ‘गेम चेंजर’ असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय गृह मंत्री अमित शाह  यांनी व्यक्त केली आहे.

राफेल  दाखल होण्याचा दिवस आपल्या भारतीय हवाई दलासाठी ऐतिहासिक दिवस आणि भारतासाठी अभिमानाचा  क्षण असल्याचे अमित शहा यांनी, अंबाला इथल्या भारतीय हवाई दलाच्या हवाई तळावर  पाच राफेल विमाने दाखल झाल्यानंतर केलेल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.

संपूर्ण देशासाठी हा सर्वात महत्वाचा दिवस असून या अत्याधुनिक विमानांचा समावेश म्हणजे भारत सामर्थ्यवान आणि  सुरक्षित राष्ट्र करण्याच्या  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्धाराची खरी साक्ष असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  भारताच्या संरक्षण क्षमता दृढ करण्यासाठी मोदी सरकार कटीबद्ध आहे.

आकाशातले कोणतेही आव्हान  पेलण्यासाठी राफेल जगातले सर्वोच्च सामर्थ्यवान असल्याचे केंद्रीय गृह मंत्र्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह,भारतीय हवाई दल आणि संपूर्ण देशाचे अभिनंदन करत भारतीय हवाई दलाला अभूतपूर्व बळकटी दिल्याबद्दल अमित शहा यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.

वेगापासून ते शस्त्र सामर्थ्यापर्यंत राफेल सर्वच बाबतीत आघाडीवर आहे. जागतिक दर्जाची ही लढाऊ विमाने गेम चेंजर ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आपल्या हवाई हद्दीचे संरक्षण करण्यासाठी आपल्या हवाई योद्ध्यांना राफेल निश्चितच  सहाय्य करेल असेही त्यांनी म्हटले आहे.


Previous Post Next Post