फलटणमध्य कोरोनाचा पुन्हा कहर; आज एकूण १४ पॉझिटिव्ह


स्थैर्य, फलटण : मौजे मुंजवडी फलटण येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील २०, ३९ व ४५ वर्षीय पुरुष/मुले तसेच ४, १३, १४, १७ व ३५ वर्षीय मुली/महिला असे एकूण ८ जणांची कोव्हीड चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. त्या सोबतच जिंती नाका, फलटण येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील १८ वर्षीय पुरुष तसेच ३३ व ७४ वर्षीय महिला यांची कोव्हीड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मौजे सासवड येथील ६४ वर्षीय पुरुष, रविवार पेठ फलटण येथील २७ वर्षीय महिला, लक्ष्मीनगर फलटण येथील ५७ वर्षीय पुरुष यांचीही कोव्हीड चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. असे एकूण आज दिवसभरात १४ जणांच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत अशी माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली.
Previous Post Next Post