सलग पाच दिवसांच्या तेजीनंतर आज शेअर बाजारात घसरण
स्थैर्य, मुंबई, ८ : सलग पाच दिवसांच्या तेजीनंतर आज भारतीय शेअर बाजाराने आज शेवटच्या तासाला व्यापारात घसरण अनुभवली. निफ्टी १० हजाराच्या पातळीपुढे राहिला तरीही तो आज ०.८७% किंवा ९३.९० अंकांनी घसरला. निफ्टी १०,७०५.७५ अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.९४% किंवा ३४५.५१ अंकांनी घसरून तो ३६,३२९.०१ अंकांवर बंद झाला.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की, आज १२२५ शेअर्सनी नफा अनुभवला तर १४९२ शेअर्स घसरले. तर १५९ शेअर्सनी स्थिर मूल्य ठेवले. इंडसइंड बँक (४.५०%), स्टेट बँक ऑफ इंडिया (१.६४%) आणि हिंदुस्थान युनिलिव्हर (१.२९%) हे निफ्टीचे टॉप गेनर्स ठरले. तर बजाज फायनान्स (४.६२%), झी एंटरटेनमेंट (४.६०%) आणि एशियन पेंट्स (३.२५%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप हे अनुक्रमे ०.३९% आणि ०.४३% नी घसरले.

एनसीसी लिमिटेड: जलविभागाशी संबंधित एकूण १,३९६ कोटी रुपये मूल्य असलेल्या पाच ऑर्डर मिळूनदेखील एनसीसी लिमिटेडचे शेअर्स १.८१% नी घसरले व त्यांनी ३२.५५ रुपयांवर व्यापार केला.

जीएमआर इन्फ्रा: जीएमआर इन्फ्रा कंपनीचे शेअर्स १.४२ टक्क्यांनी घसरले व त्यांनी २०.९० रुपयांवर व्यापार केला. कंपनीने फ्रान्सच्या ग्रुप एडीपीला ४९% स्टेक विक्री करण्याची घोषणा केली. या कंपनीने गुंतवणुकीच्या दुस-या फेरीत ४५६५ कोटी रुपये गुंतवले.

एसबीआय: सर्वात मोठा मालमत्ता कर्जदाता, स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्जदरात कपात करण्याची घोषणा केली. बँकेने जाहीर केले की, फड्स आधारीत कर्ज दर किंवा एमसीएलआर दर ५ ते १० बेसिस पॉइंट्सने कमी केला जाईल. परिणामी एसबीआयचे स्टॉक्स १.६४% नी वाढले आणि त्यांनी १९१.७० रुपयांवर व्यापार केला.

सिपला लिमिटेड: फार्मा क्षेत्रातील दिग्गज कंपनी सिपला ही एक किंवा दोन दिवसात रेमडेसिव्हिर औषध लाँच करणार आहे. ते सोव्हेरियन फार्मा प्रकल्पात ते होईल. या घोषणेेनंतरही कंपनीचे शेअर्स काहीसे घसरले. ते ०.४० % नी घटले व ६३४.०० रुपयांवर स्थिरावले.

देशांतर्गत इक्विटी मार्केट अस्थिर राहिल्याने आजच्या व्यापारी सत्रात भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत घसरून तो ७५.०२ रुपयांवर पोहोचला.

गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट बुकिंग केल्यामुळे आजच्या व्यापारी सत्रात एमसीएक्सवर नकारात्मक चित्र दिसून आले. परिणामी पिवळ्या धातूच्या दरात फ्लॅट व्यापार झाला.

आजच्या व्यापारी सत्रात काहीशा वृद्धीने सुरु झालेल्या जागतिक बाजारात काहीशी निराशा दिसत होती. अखेरच्या तासांमध्ये त्याच्या निर्देशांकात घट दिसून आली. नॅसडॅक ०८६%, एफटीएसई१०० चे शेअर्स ०.०३%, एफटीएसई एमआयबीचे शेअर्स ०.२९%, निक्केई २२५ चे शेअर्स ०.७८% नी घसरले. तर हँग सेंगचे शेअर्स ०.५९ टक्क्यांनी वधारलेले दिसून आले.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.