हणबरवाडी योजनेचे काम सद्य स्थितीत मोठ्या प्रमाणावर व वेगाने सुरू
स्थैर्य, कराड, दि. २९ : कराड-उत्तर विधानसभा मतदारसंघातील महत्त्वपूर्ण हणबरवाडी योजनेचे काम सद्य स्थितीत मोठ्या प्रमाणावर व वेगाने सुरू असल्याने या योजनेचे काम लवकरच पूर्णत्वाकडे जाणार आहे. लवकरच स्व. पी. डी. पाटील साहेब यांचे जिरायत जमीन बागायत होण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

या योजनेमध्ये सुमारे 12 गावांमधील 2 हजार 600 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. सध्या रिसवड, अंतवडी, वडोली नि, वाघेरी, बोरजाईमळा या दरम्यान पाइपलाइनचे काम गतीने सुरू आहे. लवकरच ते पूर्णत्वाकडे जाणार असल्याने जमीन ओलिताखाली येवून शेतकर्‍यांची आर्थिक प्रगती होणार आहे.

ना. बाळासाहेब पाटील यांनी योजनेसाठी मार्च 2020 अर्थसंकल्पातून सुमारे 40 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. उर्वरित निधीसाठीही पाठपुरावा सुरू ठेवला आहे. याकामी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित  पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. 
Previous Post Next Post