पळशी व चोराडे येथे चोरटयांचा मोटारींवर डल्ला; 28 हजाराच्या तीन इलेक्ट्रीक मोटारी चोरीस
स्थैर्य, औंध, दि. 30 : पळशी व चोराडे येथून  सुमारे 28हजार रुपये किंमतीच्या तीन इलेक्ट्रीक मोटारी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी पळशी येथील सोमनाथ वसंतराव देशमुख वय 43व संजय शिवराम देशमुख यांच्या उरमोडीचे कँनाँलनजीक बसविलेल्या दोन इलेक्ट्रीक मोटारी अज्ञात चोरट्यांनी पाईप व रस्सी कापून चोरून नेल्या आहेत .या दोन्ही मोटारींची किंमत सुमारे सोळा हजार रुपये आहे .

चोराडे येथील मधुकर कूष्णत साळुंखे  वय 45यांचे दडी नावचे शिवारात असणाऱ्या बोअरवेल मध्ये टाकलेली सुमारे बारा हजार रुपये किंमतीची मोटार ही चोरट्यांनी लांबवली आहे.

या इलेक्ट्रीक  मोटर चोरींची नोंद औंध पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे. चोरट्यांनी मोटार चोरींचा सपाटा लावल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. याबाबत पोलिसांनी त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
Previous Post Next Post