ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘लोकजागर प्रतिष्ठान’च्या वतीने वृक्षारोपण

स्थैर्य, फलटण : वृक्षारोपणाप्रसंगी रविंद्र बेडकिहाळ, विलास बिचुकले, भारद्वाज बेडकिहाळ, रोहित वाकडे, दादाहरी शिंदे.

स्थैर्य, फलटण : ‘अनंत आशा’ आनंदाश्रमाचा परिसर निसर्गरम्य व प्रदूषणमुक्त असून या ठिकाणी प्रतिवर्षी वृक्षारोपण करुन त्याद्वारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा लोकजागर प्रतिष्ठानचा ‘पर्यावरण पूरक’ उपक्रम गेली सलग सात वर्षे सुरु असल्याचे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी सांगितले.

लोकजागर प्रतिष्ठान, फलटणच्या वतीने वाठार निंबाळकर, ता.फलटण येथील ‘अनंत आशा आनंदाश्रम’ येथे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करुन त्यांना पर्यावरणपूरक शतायु भव शुभेच्छा देण्याचा आगळा वेगळा उपक्रम प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही संपन्न झाला. त्यावेळी बेडकिहाळ बोलत होते. यावेळी भारती विद्यापीठ, पुणेचे संगीत शिक्षक प्रा.विलास बिचुकले यांची प्रमुख उपस्थिती होती. 

वृक्षारोपणासारखा पर्यावरणपूरक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याचा लोकजागर प्रतिष्ठानचा उपक्रम स्तुत्य असल्याचे यावेळी प्रा.विलास बिचुकले यांनी सांगितले.

यावेळी लोकजागर प्रतिष्ठानचे भारद्वाज बेडकिहाळ, रोहित वाकडे, दादाहरी शिंदे, कृष्णात बोबडे, संजय चोरमले यांची उपस्थिती होती. सदर उपक्रमासाठी युवक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले. 
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.