पोवई नाका येथे शहीद जवानांना श्रद्धांजली
स्थैर्य, सातारा, दि. ०८ : भारतीय जनता पार्टी, महिला मोर्च्या सातारा शहर तर्फे  पोवई नाका सातारा येथे सीमेवर शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी चीनचा निषेध करण्यात आला.

यावेळी भारत माता की जय, चिनी वस्तूवर बहिष्कार स्वदेशीचा अंगीकार, वंदे मातरम, लाल गुलामी छोड के बोलो बोलो वंदे मातरम, या घोषणा देण्यात आल्या. भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, महिला मोर्च्या जिल्हाध्यक्ष कविताताई कचरे, सातारा शहराध्यक्ष विकासजी गोसावी, सुवर्णाताई पाटील मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात महिला मोर्च्या अध्यक्ष रिना भणगे, सातारा शहर मनीषा पांडे, चिटणीस वैशाली टंकसाळे, नजमा बागवान, माजी अध्यक्ष निर्मलाताई पाटील, माजी तालुका अध्यक्ष स्मिता निकम, कूंजा खंदारे, अंजली कन्नूर, हेमांगी जोशी, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
Previous Post Next Post