मंगळवारी 91 कोरोना बाधित : दोघांचा मृत्यू
स्थैर्य, सातारा, दि. २१ : मंगळवारी सकाळी आठजणांचे कोरोना अहवाल बाधित आल्यानंतर रात्री उशिरा 83 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर दिवसभरातील कोरोनाबाधितांची संख्या 91 वर पोहोचली आहे. विविध कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरु असलेले 69 रुग्ण कोरोनातून खडखडीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, आज दोघा कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

मंगळवारी सकाळी कोरोनाचे आठ रुग्ण सापडल्यानंतर रात्री उशिरा नव्याने 83 जणांचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात दिवसभरातील कोरोनाबाधितांची संख्या 91 झाली आहे. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा 2640 वर पोहोचला आहे. जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 69 जणांना आज डिस्चार्ज दिला.

यामध्ये ● जावली तालुक्यातील पुनवडी येथील 34,5548,55,47,42,47,40,61,47,62 वर्षीय पुरुष, कुसुंबी येथील  30 वर्षीय महिला,पुनवडी येथील एक पुरुष.
● खंडाळा तालुक्यातील शिरवळ शिर्के कॉलनी येथील  28 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 42,65 व 35 वर्षीय महिला व 7 वर्षाची बालीका, शिरवळ येथील  29,25 व 20 वर्षीय पुरुष, नक्षत्र सिटी पळशी रोड येथील 40 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी फाटा येथील  25 वर्षीय पुरुष.
● माण तालुक्यातील राजवाडी येथील 31 वर्षीय पुरुष.,
● कराड तालुक्यातील सह्यादी हॉस्पिटल येथील 65 वर्षीय पुरुष व 47 वर्षीय महिला, सुपने येथील  28 वर्षीय पुरुष, तारुख येथील 48 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील  30 , 48, 21 वर्षीय पुरुष व 75 वर्षीय महिला, हिंगनोळी येथील 85 वर्षीय महिला, शामगाव येथील 53 वर्षीय पुरुष, ओगलेवाडी येथील 35 वर्षीय महिला.
● वाई तालुक्यातील परखंदी येथील 49,38,वर्षीय पुरुष व 8 वर्षीय बालक व 38 वर्षीय महिला, नवेचीवाडी येथील 72 वर्षीय पुरुष, धर्मपुरी येथील 34 वर्षीय महिला.
● सातारा तालुक्यातील भरतगांव येथील 48 वर्षीय पुरुष, जिहे येथील 70,50, 34 व 46 वर्षीय महिला व 16 वर्षीय तरुणी, 45 वर्षीय पुरुष व 10 वर्षाचे बालक, करंडी येथील 35 वर्षीय पुरुष, गोकुळनगर येथील 15 वर्षाची बालिका.
● पाटण तालुक्यातील कामरगाव येथील  40 वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील  48,60 वर्षीय पुरुष, कडवे बु. येथील 35 वर्षीय पुरुष, सडादाडोली  येथील 85 वर्षीय महिला, साईकडे येथील 24 वर्षीय महिला, कोयनानगर येथील 52 वर्षीय पुरुष.
● खटाव तालुक्यातील निमसोड येथील 47 वर्षीय पुरुष, विठ्ठलवाडी येथील 70 वर्षीय महिला.
● फलटण तालुक्यातील फरांदवाडी येथील 69 वर्षीय पुरुष, 5 वर्षाचे बालक व 2 महिन्याचे बाळ, सरडे येथील 55,20 वर्षीय महिला, सासवड येथील 30 वर्षीय पुरुष, हिंगणगाव येथील 32 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 39 वर्षीय महिला, विंचुर्णी येथील 43 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

602 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे 63, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 65, ग्रामीण रुग्णालय फलटण येथील  26, कोरेगांव येथील 27, वाई येथील 81, शिरवळ येथील 86, रायगाव येथील 41, पानमळेवाडी येथील 27, मायणी येथील 32, महावळेश्वर येथील 4, पाटण येथील 35, खावली येथील 27 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 88 असे एकूण 602 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा निष्पन्न झालेल्या 83 कोरोनाबाधितांची तालुकानिहाय आकडेवारी मिळाली नसल्याने ती उद्या जाहीर करणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

2 रुग्णांचा मृत्यू
सातारा शहरातील खाजगी हॉस्पिटल येथे खाजगी प्रयोगशाळेत तपासणीत कोविड बाधित आलेला साबळेवाडी ता. सातारा येथील 54 वर्षीय पुरुषाचा व जिल्हा रुग्णालय सातारा येथे खातगुण, ता. खटाव येथील 85 वर्षीय कोविड बाधित महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.