ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री कुमकुम यांनी आज अखेरचा श्वास घेतला
स्थैर्य, मुंबई, दि. २८ : ५०-६०च्या दशकात तरुणांच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कुमकुम यांचं निधन झालं आहे. त्या ८६ वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या आजारी होत्या. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कुमकुम यांच्या निधनामुळे बॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. अभिनेता जगदिप यांचे सुपुत्र नावेद जाफरी यांनी कुमकुम यांच्या निधनाची बातमी दिली. “आपण आणखी एक रत्न गमावलं आहे. मी लहानपणापासून त्यांना ओळखतो. त्या आमच्या कुटुंबातील एक सदस्यच होत्या. एक उत्तम व्यक्तीमत्व. ईश्वर तुमच्या आत्म्यास शांती देवो, ही प्रार्थना, कुमकुम आंटी” अशा आशयाचं ट्विट करुन त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
Previous Post Next Post