मार्कंडेय, गंगामाई, वळसंगकर हॉस्पिटलला जिल्हाधिकारी, आयुक्तांच्या भेटी
कोरोना रूग्णांच्या व्यवस्थेची जिल्हा समितीने केली पाहणी


स्थैर्य, सोलापूर, दि. 22 : सोलापूर शहरामध्ये कोरोना रूग्णांसाठी खाजगी दवाखाने अधिग्रहित केले असून 80 टक्के बेड कोविड रूग्णांच्या उपचारासाठी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याची अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही यासाठी आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी शहरातील मार्कंडेय सोलापूर सहकारी रूग्णालय आणि संशोधन केंद्र, गंगामाई हॉस्पिटल आणि वळसंगकर हॉस्पिटलला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.

यावेळी समितीमधील सदस्य डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, श्री छत्रपती सर्वोपचार रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, आयएमएचे डॉ. हरिष रायचूर उपस्थित होते.

मार्कंडेय रूग्णालयात 105 बेड कोविड रूग्णांसाठी ठेवले असून 116 पर्यंत रूग्णांची सोय होत असल्याचे चेअरमन डॉ. माणिक गुर्रम यांनी सांगितले. यावेळी श्री. शंभरकर आणि श्री. शिवशंकर यांनी रूग्णालयांच्या अडचणी जाणून घेतल्या. कोविड हॉस्पिटलमध्ये केवळ गंभीर रूग्णांना दाखल करून उपचार करा, बाकी पॉझिटिव्ह रूग्णांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवून देण्याच्या सूचना श्री. शंभकरकर यांनी दिल्या.शासनाच्या निर्देशानुसार असलेल्या सोयी-सुविधा, व्यवस्था, कोविड वॉर्ड, ऑक्सिजन सुविधा, सीसीटीव्हीची सुविधा आणि संख्या, ते व्यवस्थित कार्यान्वित आहेत का, आयसोलेशन वॉर्डातील सुविधा कशा आहेत, आयसीयुची व्यवस्था, नातेवाईकांच्या राहण्याची व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतील लाभार्थ्यांच्या सोयी-सुविधा, मनुष्यबळ याबाबत त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सूचना केल्या. तसेच केस पेपर आणि इतर नोंदीची माहिती, दाखल आणि डिस्चार्ज पॉलिसी, रूग्णांसाठी फोनची सुविधा, डॅशबोर्ड, पल्स ऑक्सिमिटर यांचीही माहिती घेऊन सुधारण्या करण्याबाबत सूचना दिल्या.

शंभरकर यांनी समुपदेशनासाठी वेगळी जागा उपलब्ध करून द्या, गंगामाई हॉस्पिटलमध्ये कोविड रूग्णांसाठी 15 आयसीयु बेडची व्यवस्था आणि आवश्यक रूग्णांना ऑक्सिजनची व्यवस्था करण्याच्या सूचना हॉस्पिटल प्रशासनाला दिल्या. वळसंगकर हॉस्पिटलमध्ये 30 पैकी 10 बेड कोविडसाठी आहेत. याठिकाणी 10 व्हेंटिलेटरची सुविधाही आहे. काही त्रुटी आढळल्या त्याची पुर्तता करण्याचे निर्देश श्री. शंभरकर यांनी दिले असून जिल्ह्यातील इतर ठिकाणीही जिल्हास्तरीय समिती पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोविड-19 रूग्णालयांची नियमित तपासणी व देखरेखीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती नियुक्त केली आहे. यामध्ये सदस्य म्हणून मनपा आयुक्त, अधिष्ठाता, जनरल मेडिसिनचे विभागप्रमुख, जिल्हा सर्व्हेक्षण अधिकारी, मनपा आरोग्य अधिकारी, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष, सदस्य सचिव म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक हे आहेत.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.