साथ प्रतिष्ठाण च्या मदतीने विदुषक गहिवरला..
स्थैर्य, सातारा, दि. ०९ : सर्कस मध्ये आपल्या कलागुणांतुन पोटाचीखळगी भरण्यासाठी विदुषक (जोकर) हसताना पाहिला हसवताना पाहिला परंतू आज कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य रोगाचा प्रसार रोखण्यासाठी लाॅकडाऊन परिस्थितीत या सर्कस कलावंतांवर उपासमारीची वेळ आल्याने गहिवरताना निदर्शनास आला.

वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मिडिया माध्यमातून खंडाळा तालुक्यात शिरवळ, पळशी नजीक गावडेवाडीच्या माळरानावर अडकून पडलेल्या ग्रेट रेमन सर्कस कलावंतांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे समजताच साथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष कय्युम मुल्ला, सचिव मंगेश माने, उपाध्यक्ष दिपक बाटे, शौकतभाई शेख (पळशी) , रोहित शेलार यांनी समक्ष भेटीद्वारे परिस्थिती जाणून घेऊन मदतीचे आवाहन केले प्रमाणे या आवाहनाला प्रतिसाद देऊन मालोजीराजे विद्यालय च्या 86 /87 बॅच सर्व प्रथम सरसावली या बॅच मधील दानशूर मान्यवर , नगरसेवक हणमंतराव शेळके पाटील व इतर काही दानशूर मान्यवर व साथ प्रतिष्ठाण यांचे सहकार्याने त्यांना गहु, तांदूळ, तेल डबा, विविध प्रकारचे डाळी, कांदे आदी जिवनावश्यक साहित्य भेट म्हणून दिले हि उदरनिर्वाहासाठी ची भेट पाहताच ह्रदयविकाराने त्रस्त असलेल्या ग्रेट रेमन सर्कस चे मालक प्रकाश माने व उपस्थित कलावंत गहिवरून गेले.

विविध कंपन्यांमधे पोटाची खळगी भरण्यासाठी हाताला काम शोधताना महिला कलावंतांवर होत असलेले गंभीर आरोप व यातून होत असलेल्या माणसिक तनाव याची व्यथा येथील कलावंतांनी व्यक्त केली. शिरवळ व परिसरातील दानशूर मान्यवरांनी सहकार्य केले आहे करत आहेत परंतु 70/75 कलावंत व विविध प्रकारचे श्वान यांना संभाळणे कामी  शिरवळ व पंचक्रोशीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या व यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बंद परिस्थितीत भिक मागणेपण मुश्किल झाले आहे.

कमी उंचीच्या विदुषक कलावंत व वेगवेगळ्या जातीचे श्वान यांचेसह जगणे जिकिरीचे झाले आहे असा टाहो या लोक कलावंतांनी फोडला.

अशा कलावंतांसाठी मदतीच्या हातांची अतोनात गरज असून त्यांना उचित सन्मान व सहकार्य करणेकामी विविध क्षेत्रातील संस्था व दानशूर मान्यवरांनी साथ प्रतिष्ठान लोणंद यांस संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Previous Post Next Post