वावरहिरे येथे पाणलिंग मंदिर परिसरात तरुणांनी केले वृक्षारोपण
स्थैर्य, वावरहिरे, दि. २० : माण तालुका हा कायम दुष्काळी भाग परंतु जलसंधारणाच्या कामामुळे हि परिस्थिती हळुहळु बदलु पाहात आहे. आपल्या भारताची लोकसंख्या जसजशी वाढत आहे तसतशी झाडेसुद्धा कमी होत आहेत. त्यांचा परिणाम  पर्यावरणावर होत असल्याचे आपण पाहतो. वृक्षतोडही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाणही कमी होत आहे. परिणामी दोन तीन वर्षातुन या भागात  पडणारा भीषण दुष्काळ व जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात  निर्माण होत असतो. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जमिनीची धुप मोठ्या प्रमाणात होऊन  जमीन नापीक होते एकुणच ही परिस्थिती बदलायची असेल तर वृक्षारोपण आणि त्याचबरोबर त्याचे सवंर्धनही  मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे.सध्या सर्वञ पावसाच्या अल्हाददायक सरी बरसत आहेत. वातावरणही चांगले आहे. पर्यावरण रक्षणासाठी वृक्षलागवड, वृक्षसंगोपन, संवर्धनकरणे काळाची गरज आहे. त्यासाठी व्यापक स्वरुपात वृक्षलागवड झाली पाहिजे. म्हणुन 'झाडे लावा झाडे जगवा' हि सामाजिक वनीकरनाची संकल्पना खर्‍या अर्थाने राबवत वावरहिरे येथे पाणलिंग मंदिर परिसरात श्री गजानन कवळे यांच्या मार्गदर्शनाखाली जास्वदं, लिंब, वड करंज, बेल आदी दोनशे झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी दत्ताञय खिलारे, रवि मोहिते, सुरज जाधव, नवनाथ खिलारे, शब्बीर शेख, श्रीकांत पांढरे आदी तरुणांनी पाणलिंग मंदिर  परिसरात खड्डे काढुन विविध झाडाचे वृक्षारोपण केले. वृक्षारोपण ही सध्या काळाची गरज बनली आहे. बेसुमार वृक्षतोड होत असल्याने पृथ्वीवरचे तापमान हळुहळु वाढु लागले आहे. आता सध्याची तरुण पिढी जागरुक झाली आहे. सोशल इंजिनिअरिंग व सामाजिक माध्यमातुन वृक्षसंवर्धनाची चळवळ जोमाने पुढे येत आहेत अशीच चळवळ आमच्या गावातील या तरुण वर्गाने गेली दोन महिने सुरु ठेवली असल्याचे श्री गजानन कवळे यांनी सांगितले.


Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.