देऊर तालुका कोरेगाव येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक, दि. १० : शुक्रवार दि.10 रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान देऊर येथील कैलास शिवाजी भंडलकर (वय 36) या युवकाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. वाठार स्टेशन पोलिसांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार कैलास शिवाजी भंडलकर याने आपल्या स्वतःच्या राहत्या घरात लोखंडी अँगलला काळ्या रंगाच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली असून सदर घटनेची खबर जालिंदर रामचंद्र जाधव यांनी वाठार पोलीस स्टेशनला दिली असून आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.पुढील तपास पोलीस हवालदार भोसले करीत आहेत.
Previous Post Next Post