वरूण राजा कुठे गेला रं ? जोमात असणार घेवडा पिंक पावसाअभावी कोमात जाण्याची वेळ




कडक उन्हामुळे शेतकरी राजा धास्तावला : पिकांना एका पावसाची गरज

स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक,दि.२२ (रणजित लेंभे) : जुलैमध्ये हमखास असणारा पाऊस गायब झाला आहे, हंगाम पुर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी बांधवांनी वरुण घेवडा, वाटाणा आणि इतर पिकांची पेरणी केली आहे. मात्र पाऊस गायब झाला असून ऊन कडक पडू लागल्याने फुलकळीत व जोमात आलेली पिंक कोमजू  लागली आहेत. पाऊस हुलकावणीत देत असल्याने ऐन भरात आलेले पिक वाया जाते की काय या भीतीने शेतकरी वर्ग आभाळाकडे डोळे लावून एका चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आस लावून बसला आहे.

कोरेगाव  तालुक्यातील उत्तर भागात मध्यम पाऊसाच्या आधारावर १५ जूनच्या दरम्यान बहुतांशी पेरण्या उरकल्या, परिसरात  घेवडा, वाटाणा, बटाटा व कडधान्य हे पीक घेतली जातात.जूनच्या शेवटच्या आठवड्यात तुरळक पाऊस झाल्याने पीक जोमात आली आहेत. शेतकऱ्यांनी वेळेत गवत कोळपणी आणि खुरपणी केली आहे.सोबत पीक चांगली यावीत म्हणून अनेक शेतकऱ्यांनी तणनाशक व किटकनाशका  बरोबर टॉनिक मारले आहे. बागायती पीक सोडली तर इतर जिरायती शेतकरी औषधांच्या भानगडीत पडला नव्हता, मात्र कधी नव्हतं यावेळी कृषीसेवा व खतांच्या दुकानांत शेतकऱ्यांची झुंबड उडाली होती.जवळपास संपूर्ण सध्याचे पीक पावसावर अवलंबून आहे. सध्या घेवडा पिक जोमात आलें आहे, फुलकळीचा चांगला भर आला आहे. मात्र कडक उन्हात पान माना टाकू लागली आहेत. अजून दोन तीन दिवस अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. या पिकांना एका पावसाची अत्यंत गरज आहे. मात्र जुलै महिना संपत आला तरी म्हणावा असा पाऊस पडला नाही, गेल्या पाच सहा दिवस झाले वातावरणात प्रचंड उखाडा व कडक उन्ह पडतं आहे. त्यामुळे पाऊस नाही पडला तर पिक धोक्यात येऊ शकतात या काळजीने शेतक-यांच्या तोडी एकच शब्द येतो की अरे वरूण राजा कुठे गेला तु रं? अशी आर्त भावना व्यक्त केली जात आहे. एकंदर घेवडा पिकाला एका चांगल्या पावसाची गरज आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.