शिक्षक समितीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
शिक्षक समितीच्यावतीने एहसास मतिमंद शाळेतील मुलांना फळे वाटप शिक्षक: पोलीस योद्धे यांचा सन्मान


स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक, दि. २३ : (रणजित लेंभे) आचार्य भा.वा. शिंपी गुरुजींनी शिक्षकांच्या प्रश्नासाठी व अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी लावलेले रोपटे म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती होय. या शिक्षक समिती चा आज ५८ वा वर्धापन दिन सातारा जिल्हा शिक्षक समितीच्या वतीने साजरा करण्यात आला.

शिक्षक भवन सातारा येथे वंदनीय भा.वा.शिंपी गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्व शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आदरांजली वाहिली. यावेळी शिक्षक समितीची निर्मिती तसेच आजवर गेली 58 वर्षे शिक्षकांच्या प्रश्नासाठी अभेद्य असणारी संघटना म्हणजे शिक्षक समिती ने कोणकोणते मोर्चे आंदोलने केली व त्याचे फलित काय काय झाले हे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी यावेळी सांगितले. न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड ह्या ब्रीदवाक्याप्रमाणे सातारा जिल्ह्यात शिक्षक समिती काम करीत असल्याचे जिल्हाध्यक्ष शंकर देवरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.वर्धापन दिनाच्या निमित्ताने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरात ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता रस्त्यावर सेवेत असलेल्या पोलीस बंधू-भगिनींचा त्यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. त्यांना पुढील कामकाजास शुभेच्छा देण्यात आल्या. तदनंतर एहसास मतिमंद मुलांची शाळा वळसे ता. सातारा येथे जाऊन मान्यवरांच्या हस्ते येथील शाळेतील मुलांसाठी फळे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी या शाळेतील मुख्याध्यापक कांबळे सर यांना येथून पुढे शाळेसाठी शिक्षक समिती म्हणून वेळोवेळी मदत करण्यात येईल असा शब्द शिक्षक समितीच्या वतीने देण्यात आला.अशा पद्धतीने शिक्षक समितीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी खालील मान्यवर उपस्थित होते.शिक्षक समिती राज्याध्यक्ष उदय शिंदे, जिल्हाध्यक्ष शंकरराव देवरे, तालुकाध्यक्ष अनिल चव्हाण, शिक्षक बँकचे संचालक किरण यादव, कराड व पाटण तालुका शिक्षक सोसायटी माजी व्हा.चेअरमन अनिल कांबळे, कोरेगाव तालुका उपाध्यक्ष उदय घोरपडे, किसन खताळ, विठ्ठल घाडगे, धनाजी देशमुख उपस्थित होते.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya