फलटण तालुक्यात करोनाचा हाहाकार; आताच आलेल्या अहवालानुसार नव्याने पंधरा रुग्णांची भर


स्थैर्य, फलटण : फलटण शहरासह तालुक्यांमध्ये करोना या आजाराने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. आज नव्याने 15 पॉझिटिव्ह रुग्णांची भर फलटण तालुक्यामध्ये पडलेली आहे. मलवडी येथे राहणाऱ्या  २९ वर्षीय पुरुषाचा कोविड अहवाल पाॅसिटीव्ह आला आहे. सदरील रुग्णास सारी आजाराची लागण झालेली होती व सदरील रुग्ण हा मुंबई प्रवास हिस्ट्री आहे. त्यासोबत खंडाळा तालुक्यातील पाॅसिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील मलटण, फलटण येथील ३९ वर्षीय महिला पाॅसिटीव्ह आली आहे. अलगुडेवाडी येथील पाॅसिटीव्ह व्यक्तीच्या निकट संपर्कातील १४ वर्षीय मुलगी कोविड पाॅसिटीव्ह आली आहे व रविवार पेठ, फलटण येथील पाॅसिटीव्ह व्यक्तींच्या निकट संपर्कातील ९ पुरुष/मुले (७, १२, २०, १६, ३८, ६८, ४३, ४०, ३२ वर्षे) व ३ महिला/मुली (१४, १४, २५ वर्षे) कोविड पाॅसिटीव्ह आले आहेत, असे एकूण 15 नवीन करोना रुग्णांची भर फलटण तालुक्यात पडलेली आहे, अशी माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली.
Previous Post Next Post