जावली तालुक्यातील रास्त भाव दुकानांच्या परवाना मंजुरीसाठी 10 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 स्थैर्य, सातारा दि. 11 :  सातारा जिल्ह्यामध्ये रास्त भाव दुकान, रास्त भाव दुकान व किरकोळ केरोसीन दुकान परवाना देण्यासाठी  ग्रामापंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था व स्वयंसहाय्यता बचत गट यांना रास्त भाव दुकान व दोन्ही दुकानांस परवाना मंजूर करुन देण्यासाठी दि. 10 सप्टेंबर 2020 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.


नवीन कायमस्वरुपी दुकान परवाने खालील गावांतील, क्षेत्रातील  सर्व पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य  संस्था) नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महलिा सव्यंसहाय्यता बचत गट व महिलांच्या हसकारी संस्था यांनी ज्या तालुकयातील गावांपैकी, क्षेत्रापैकी ज्या विशिष्ट गावात , क्षेत्रात  रास्तभाव दुकान, किरकोळ केरोसीन परवाना चालविण्याची इच्छा आहे. त्यांनी विहित करण्याता आलेल्या अर्जाच्या नमुन्यात संबंधित तहसिलदार यांच्या कार्यालयात विहीत कालावधीत व विहीत नमुन्यात अर्ज सादर करावेत. अर्ज कार्यालयीन वेळेत  स्विकारले जातील. विहीत नमुनयातील अर्ज महसिलदार यांचे कार्यालयात रक्कम रु. 5/- चलनाद्वारे सरकारी खजिन्यात जमा करुन घेऊन दिले जातील. खालील गावांसाठी, क्षेत्रांसाठी परवाने देण्यात येणार आहेत.


रास्त भाव धान्य दुकान परवानासाठी तहसिलदार, गावांचे, क्षेत्रांचे नांव पुढील प्रमाणे.


जावली तालुक्यातील महिगाव, दापवडी, करहर, हुमगाव, विवर, रांजणी, प्रभुचीवाडी, आसणी, बामणोली त. कुडाळ, भामघर, केळघर, सरताळे, पुनवडी, हातगेघर, पिंपळी, आखाडे, गवडी.

Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.