157 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 218 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

 स्थैर्य, सातारा दि. 23 :  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या  157 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 218 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 


विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये   ● जावली तालुक्यातील 4, ● कराड तालुक्यातील 7, ● खंडाळा तालुक्यातील 19, ● खटाव तालुक्यातील 7,   ● कोरेगाव तालुक्यातील 4, ● महाबळेश्वर तालुक्यातील 1, ● माण तालुक्यातील 1, ● पाटण तालुक्यातील 3, ● फलटण तालुक्यातील 30, ● सातारा तालुक्यातील 76, ● वाई तालुक्यातील 5 असे एकूण 157 नागरिकांचा समावेश आहे.


218 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 10, उपजिल्हा रुग्णालय फलटण 108, रायगांव 40, पानमळेवाडी 33, मायणी 16, महाबळेश्वर 11   असे एकूण 218 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.


 

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya