अँटी जेन टेस्ट मध्ये तालुक्यातील 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; आज एकूण 28 जणांचे अहवाल आले पॉझिटिव्ह

स्थैर्य, फलटण : तालुक्यातील कोर्हाळे या गावातील 60 वर्षीय पुरुष, मांडवखडक येथील 69 वर्षीय पुरुष, मलठण येथील 51 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ येथील 20 वर्षीय महिला, 40 वर्षीय महिला, 20 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 27 वर्षीय महिला, 31 वर्षीय पुरुष, खाटीक गल्ली 43 वर्षीय पुरुष, मेटकरी गल्ली येथील 53 वर्षीय महिला, लोहार गल्ली (मलठण) येथील 65 वर्षीय महिला, 76 वर्षीय पुरुष, साखरवाडी येथील 55 वर्षीय महिला असे एकूण 16 जणांचे कोरोना बाबतचे अहवाल अँटी जेन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेले आहेत. आज सकाळी 8 वाजता 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले होते त्या मूळे एकूण 28 जणांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी 14 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 8.30 वाजता दिली.

Previous Post Next Post