फलटणमध्ये आणखी ९ जण कोरोनाबाधित; रॅपिड अँटीजेन टेस्टचा अहवाल

स्थैर्य, फलटण : फलटण तालुक्यातील विडणी येथील ५५ वर्षीय महिला, ३० वर्षीय महिला, तामखडा (जाधववाडी, आसू) येथील २५ वर्षीय महिला व २० वर्षीय महिला, कोळकी येथील ५४ वर्षीय पुरुष, निरगुडी येथील ३२ वर्षीय पुरुष या सोबतच फलटण शहरातील मंगळवार पेठ येथील ३१ वर्षीय पुरुष व २३ वर्षीय पुरुष व रविवार पेठ येथील ६५ वर्षीय महिला अश्या एकूण ९ जणांचा कोरोनाच्या रॅपिड अँटीजेन टेस्टचा पॉझिटिव्ह अहवाल आज दिनांक ११ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ४ वाजता मिळाला आहे, अशी माहिती फलटणच्या प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली आहे.

Previous Post Next Post