सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या विज वितरणच्या त्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा - म्हसवडकर
स्थैर्य, म्हसवड दि. १ : विज वितरण कंपनीच्या माण तालुक्यातील शेनवडी फिडरवरील ठेकेदार व कनिष्ठ अभियंता यांच्यामध्ये झालेल्या वादावादीतुन ठेकेदाराला धडा शिकवण्यासाठी विज कंपनीने अचानकपणे आंदोलनाचे हत्यार उपसत संपुर्ण माण व खटाव या दोन तालुक्यातील विज बंद करुन लाखो जनतेला वेठीस धरल्याने सामान्य जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला असुन खाजगी वादासाठी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरुन अंधारात ठेवणार्या विज कंपनीच्या त्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी म्हसवडकर जनतेतुन होत आहे.

विज वितरणच्या शेनवडी येथील फिडरवरील ठेकेदार व कनिष्ठ अभियंता यांची काही कारणास्तव दि.२४ जुलै रोजी वादावादी झाली होती त्या संदर्भात संबधीत अभियंत्याने म्हसवड पोलीस स्टेशनला तक्रार देवुन संबधीत ठेकेदारावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्याची मागणी केली होती, मात्र पोलीसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता पण सबळ कारण नसल्याचे सांगुन अटक केली नव्हती याचाच रोष ठेवत संबधीत अभियंत्याने आपल्या संघटनेला यामध्ये सामावुन घेत दि. ३१ रोजी अचानकपणे दुपारपासुन विज बंद आंदोलन पुकारत संपुर्ण माण व खटाव या दोन तालुक्याचा विद्युत पुरवठा बंद केला त्यानंतर जशी रात्र होत गेली तशी विज कंपनीच्या या आंदोलनाची माहिती म्हसवडकर जनतेला व माण तालुक्यात समजली त्यानंतर म्हसवड शहरातील काही कार्यकर्त्यांनी थेट म्हसवड पोलीस स्टेशन गाठत याबाबतची माहिती घेत सर्वत्र फोनाफोनी केली असता बहुतांशी विज कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आपले फोन बंद ठेवल्याने लक्षात आल्याने अखेर याबाबत प्रांताधिकारी व तहसिलदारांना तालुक्यातील खंडित झालेला  विद्युत पुरवठा पुर्ववत सुरु करण्याची विनंती केली तेव्हा प्रशासनाने यामध्ये लक्ष घालत तालुक्याचा विज पुरवठा रात्री १० वाजता सुरु केल्याचे समजते. रात्री १० वाजता जरी विज पुरवठा सुरु झाला असला तरी तोवर नाहकपणे सर्वसामान्य जनतेला वेठीस धरुन त्यांना अंधारात ठेवणाऱ्यांचे काय ? असा प्रश्न आता हीच सामान्य जनता विचारु लागली आहे. तालुक्यातील विज पुरवठा खंडित करुन सामान्यांना वेठीस धरुन पुकारलेले आंदोलन हे कोणत्या कायद्यात बसते ? विज कंपनीला आंदोलनच करायचे होते तर त्यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात अथवा कंपनी कार्यालयासमोर करावयास हवे होते त्यासाठी सामान्य जनतेलाच का वेठीस धरले ? वास्तवीक वाद हा संबधीत ठेकेदार व कनिष्ठ अभियंता यांच्यात झालेला आहे त्यामध्ये सर्वसामान्य विज ग्राहकांचा काय दोष ? या सर्व उभारलेल्या प्रश्नांची उत्तरे म्हणुन विज कंपनीच्या सर्व जबाबदार घटकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी म्हसवडकर जनतेतुन होत याची दखल जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी घेतील का अशी विचारणा सर्वसामान्य जनतेतुन होत आहे.

सोशल मिडीयावर सध्या या आंदोलनाच्या मागे घेण्यावरुन शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा सुरु असुन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या म्हण्यानुसार पालकमंत्र्यांनी यात लक्ष घातल्याने विज पुरवठा सुरु झाला, तर शिवसेनेच्या म्हण्यानुसार शिवसेनेने दिलेल्या कडक इशाऱ्यामुळेच विज पुरवठा सुरळीत झाला आहे, मात्र हे दोन्ही पक्ष सर्वसामान्य जनतेला नाहकपणे वेठीस धरणाऱ्या विजकंपनीवर जोवर गुन्हा होत नाही तोवर आंदोलन पुकारतील का ? हा खरा प्रश्न आहे.

गुन्हा दाखल न करण्यासाठी थेट बारामतीवरुन फोन
संबधीत ठेकेदारावर गुन्हा दाखल होवु नये याकरीता संबधीत ठेकेदाराच्या निकटवर्तीयांनी थेट बारामतीला संपर्क साधत पोलीसांवर दबाव आणल्याची चांगलीच चर्चा शहरात सुरु आहे त्यामुळेच पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली असल्याचे बोलले जात आहे.

लॉकडाउन मध्येच भरमसाठ विजबीले
सध्या गत ४ ते ५ महिन्यांपासुन लॉकडाउन सुरु असल्याने सर्वसामान्यांच्या हाताला काम नाही बहुतांशी जनता घरी बसुन आहे अशा परिस्थितीत दोन दिवसांपुर्वी विज कंपनीने हजारो रुपयांची विज बिले ग्राहकांच्या हाती दिली आहेत ही बिले पाहुन मात्र ग्राहकाला शॉकच बसला आहे.
Previous Post Next Post