म्हसवड शहरात नव्या १२ बाधितांची भर

 

म्हसवड पालिकेकडुन अग्निशमन द्वारा शहरात राबवण्यात येत असलेली निर्जंतुकीकरणाची फवारणी.स्थैर्य, म्हसवड दि. २२ : म्हसवड शहरातील कोरोनाची साखळी तुटण्याचे नावच घेत नसुन एक दिवसाच्या विश्रांती नंतर शनिवारी पुन्हा शहरात १३ नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले असुन यामध्ये ८ पुरुष तर ५ महिलांचा  समावेश आहे.


शहरातील कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी मुळे म्हसवडकर नागरीक भयभित झाले असुन कोरोनाची ही साखळी कधी थांबणार असा सवाल म्हसवडकर जनता आता विचारु लागली आहे. शहरात वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवार दि. २२ रोजी पालिका नगरसेवकांनी एकत्र येत शहरवासीयांना सोमवार दि. २४ पासुन ५ दिवस कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन केले असुन जनतेनेही त्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे मान्य केले आहे.


दरम्यान शनिवार दि. २२ रोजी शहरातील शिवाजी चौक येथील ६० वर्षीय पुरुष, शिक्षक कॉलनी येथील ३८ वर्षीय पुरुष, कोष्टी गल्ली येथील ३९ वर्षीय पुरुष, सुतार गल्ली येथील ४८ वर्षीय पुरुष व अन्य एका ठिकाणच्या १९ वर्षीय युवतीसह येथील आंबेडकरनगर येथील ४५ वर्षीय महिला, २८ वर्षीय पुरुष, २२ वर्षीय महिला तर येथील खासबाग मळा परिसरातील ५५ वर्षीय पुरुष, ५२ वर्षीय महिला, ४० वर्षीय पुरुष, ४० वर्षीय पुरुष, १३ वर्षीय मुलगी व ८ वर्षीय मुलगा या सर्वांचा कोरोना अहवाल हा पॉझीटिव्ह आला आहे. तर अन्य एकाचा कोरोना अहवाल हा येणे बाकी असल्याचे आरोग्य विभागा कडुन सांगण्यात आले.


पालिकेकडुन शहरात निर्जंतुकीकरणाची फवारणी -

शहरात दररोज वाढणार्या कोरोना बाधितांची संख्या रोखण्यासाठी म्हसवड पालिकेने खबरदारी म्हणुन संपुर्ण शहरात निर्जंतुकीकरणाची मोहिम सुरु केली असुन पालिकेच्या अग्निशमन द्वारे शहरातील मुख्य बाजारपेठेत फवारणी सुरु केली आहे, तर छोट्या गल्ल्यांमध्ये छोट्या वाहना द्वारे फॉगींग सुरु केले आहे.Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.