कृषी कार्यानुभव आता विद्यार्थ्यांच्या गावच्या शिवारातच


 


स्थैर्य, कातरखटाव, दि. ३० : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत राबविण्यात येणार कृषी कार्यानुभव उपक्रम कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे  आता विद्यार्थ्याना  आपापल्या गावातच राबवावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे.


याबाबत अधिक माहिती अशी : घारगाव येथील साई कृपा कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी कृषीदूत किरण हणमंत फडतरे याने खातवळ ( ता.खटाव ) येथे "वर्क फ्रॉम और व्हिलेज" अंतर्गत कृषी कार्यानुभवास प्रारंभ केला असून शेतकऱयांच्या बांधावर जाऊन " रावे " चा  प्रात्यक्षिक करत शेतकऱ्याना माहिती देत आहे. शेतकऱयांना ही आधुनिक माहितीचा फायदा होणार असल्याने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे, आर्थिक,व सामाजिक विकास, शेती व पिकसंबंधी सखोल माहिती मिळत असल्याने शेतकरी सुखावला आहे. विविध प्रकारच्या समस्यांवर मात करण्यासाठी शेतकऱयांना हे मार्गदर्शन होत असल्याने कृषी दूत हे शेतकऱ्यासाठी देवदूत ठरत असल्याचे प्रगतशील शेतकरी रामचंद्र फडतरे यांनी सांगितले.


वर्क फ्रॉम व्हिलेज मुळे आपल्या आय पांढरीतील शेतकऱयांशी संवाद साधलयाचा वेगळा आनंद मिळत असून आपल्या ज्ञानाचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यास होत असल्याने मन:स्वी समाधानी आहे.

कृषिदूत किरण फडतरे


 

Previous Post Next Post