म्हसवड शहरात आणखी एकजण पॉझीटिव्ह
स्थैर्य, म्हसवड दि. 1 : म्हसवड शहरात दोन जणांचा कोरोना अहवाल हा बाधित आल्याची वार्ता शहरात पसरली असतानाच आज शहरातील आणखी एका व्यक्तीचा कोरोना अहवाल हा बाधित आल्याने शहरातील कोरोनाची संख्या वाढु लागली असुन ही वाढत जाणारी साखळी तोडण्यात प्रशासनाला यश कधी येणार असा प्रश्न म्हसवडकर जनतेतुन विचारला जावु लागला आहे.

म्हसवड शहरातील पती व पत्नीचा कोरोना अहवाल हा दि.३१ रोजी बाधित आल्याचे वृत्त येताच शहरात एकच खळबळ उडाली असतानाच येथील कोष्टी गल्ली येथे राहणाऱ्या एका ५५ वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल हा बाधित आल्याचे वृत्त शहरात येवुन धडकल्याने शहरवासियांच्या चिंतेत भर पडली आहे.

यापुर्वी सापडलेल्या कोरोना रुग्णाचा दुर्देवी अंत झाल्यावर शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आले होते, त्यानंतर शहर हळुहळु पुर्व पदावर येत असतानाच दि.३१ रोजी शहरातील दोन जणांचा कोरोना अहवाल हा बाधित आला तर लगेचच दुसऱ्या दिवशी अन्य एकाचा कोरोना अहवाल हा बाधित आल्याने शहरवासियांच्या मनात धडकी भरली आहे. दि. १ रोजी सापडलेली व्यक्ती ही काही दिवसांपुर्वी ही सांगली जिल्ह्यातील दिघंची येथे आपल्या नातेवाईकाकडे गेल्याची चर्चा असुन तेथुन परत आल्यावर त्या व्यक्तीला त्रास होवु लागल्याने त्या व्यक्तीने शहरातील दोन खाजगी नामांकित डॉक्टरांकडे आपली तपासणी केली असुन त्यानंतर येथील आरोग्य केंद्रातही तपासणी केल्याची चर्चा आहे. सदर बाधित व्यक्ति ही दि.१८ रोजी दिघंची येथे गेली होती त्यानंतर दि.२२ रोजी त्या व्यक्तीला त्रास होवु लागल्याने त्याने येथील एका खाजगी रुग्णालयात दि.२३ रोजी तपासणी केली पण त्रास कमी झाला नसल्याने परत दि.२४ रोजी शहरातील दुसऱ्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु केले त्याठिकाणी दि.२४ ते २६ असे उपचार घेवुनही फरक न पडल्याने अखेर त्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दि.२७ रोजी धाव घेतली त्यानंतर आरोग्य केंद्राच्या सल्ल्याने त्याने उपचारासाठी कराड येथील खाजगी रुग्णालयात धाव घेतली त्याठिकाणी उपचार सुरु असताना दि.२९ रोजी संबधीत व्यक्तीचा स्वाईप घेण्यात आला होता त्याचा रिपोर्ट दि. ३१ रोजी उशीरा आरोग्य विभागाला प्राप्त झाला असुन तो रिपोर्ट पॉझीटिव्ह असल्याचे समजते. हा रिपोर्ट आरोग्य विभागाच्या हाती येताच आरोग्य विभागाने संबधीत व्यक्ति ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणाला भेट देत त्याच्या घरातील अन्य सदस्यांना होम क्वॉरंटाईन केले, तर पालिकेने खबरदारी म्हणुन येथील भंडारे बोळ ते चौंडेश्वरी मंदिर, ते मणेर बोळ, व माळी गल्ली बाय पास रोड हा परिसर कंन्टेटमेंट झोन जाहीर करुन या परिसरात ये-जा करण्यास नागरीकांना मज्जाव केला आहे.

दरम्यान शहरात कोरोनाची साखळी वाढु लागली असल्याने नागरीकांमध्ये भिती निर्माण झाली आहे, तर कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला येथे आणखी खबरदारी घ्यावी लागणार आहे.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.