शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे गुणवंत विद्यार्थ्यांना आवाहन
स्थैर्य, सोलापूर,दि.31 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे 10वी, 12वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमात साठ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एल.एस. क्षीरसागर यांनी केले आहे.  

त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मातंग समाज व तत्सम बारा पोट जातीतून गरजू व होतकरु विद्यार्थी, विद्यार्थींनींनी 14 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज करावा. अर्जासोबत 2018-19 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेले गुणपत्रिका, शाळा सोडलेला दाखला, जातीचा दाखला, पुढील वर्षात प्रवेश घेतल्याची पावती, रेशनकार्ड आदी कागदपत्रे जोडावीत. अधिक माहितीसाठी महामंडळाचे जिल्हा कार्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता,शासकीय विश्रामगृहाच्या मागे, सोलापूर येथे संपर्क साधावा. ई-मेल आयडी dmlasdcsolapur@gmail.com या ईमेलवर अथवा दूरध्वनी क्रमांक 0217-2311523 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. क्षीरसागर यांनी केले आहे.
Previous Post Next Post