महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या मंत्रालयीन सचिव पदी शाहरुख मुलाणी यांची नियुक्ती

 स्थैर्य, मुंबई. : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ च्या मंत्रालयीन सचिव पदी शाहरुख मुलाणी यांची निवड संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व राज्य संघटक संजय भोकरे यांनी  नियुक्ती पत्र देऊन केली आहे.


शाहरुख मुलाणी हे चळवळीतील कार्यकर्ते, निर्भीड, पत्रकार, मनमिळाऊ स्वभावचे असल्याने त्यांचा दांडगा संपर्क आहे. पत्रकारांचे वेतन,घर यासह अनेक प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी पत्रकारांची एकजूट करून त्यांना न्याय देण्यासाठी मंत्रालयीन पातळीवर प्रयत्न करणार असून पत्रकारांचे, जनसामान्यांचे न्यायीक विषय सरकार दरबारी मांडणे, संघातील ग्रामीण पत्रकारांच्या भेडसावणाऱ्या समस्या यासाठी मुख्यमंत्रीकडून सोडवून घेतले जातील असे मुलाणी सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकारांसह वर्तमानपत्रातील काम करणारे पडद्या मागे डीटीपी ऑपरेटर, कार्यालय कर्मचारी त्याचबरोबर टीव्ही न्यूज चॅनल मधील पत्रकार सोबत असणारे कॅमेरामन, ओबी व्हॅन मधील कर्मचारी, त्याच बरोबर कार्यालयीन कर्मचारी यांच्या साठी विशेष कार्य करणार असल्याचे मुलाणी यांनी सांगितले. राज्यात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, क्रीडा विषयांचे बातमीपत्र गाजले आहेत. त्यांच्या या कार्याची शासन दरबारी विशेष नोंद घेतली गेली आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्ष मुंडे म्हणाले की, मंत्रालयीन कामकाजासाठी आणि संघटनेच्या वाढीसाठी तसेच पत्रकार संघाची ध्येय धोरणे आणि कार्य करण्यासाठी मुलाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीपत्रामध्ये संघटनेचे ध्येय धोरणाच्या आधिन राहुन आपल्या कार्यक्षेत्रात संघटना मजबुत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न कराल ही अपेक्षा ! व्यक्त करीत शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.


यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, वृत्तवाहिनी अध्यक्ष रणधीर कांबळे, प्रदेश महासचिव विश्वासराव आरोटे आदी पदाधिकारी यांनी नूतन पदाधिकारी शाहरुख मुलाणी यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन व्यक्त केले आहे.


Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.