सातारा जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी डॉ. सौ. सुरभी चव्हाण-भोसले

 स्थैर्य, सातारा, दि. २१ : भारतीय जनता पक्षाची जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी जाहीर केली. यामध्ये सातारा जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी डॉ. सौ. सुरभी चव्हाण-भोसले यांची तर भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी सतीश भोसले यांची निवड करण्यात आली.


भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीत तरुण तसेच अनुभवी चेहर्‍यांना संधी देण्यात आली असून डॉ. सौ. सुरभी चव्हाण-भोसले या शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. सुरभी भोसले-चव्हाण या माजी आ. मदन भोसले यांच्या कन्या आहेत.  सतीश भोसले हे राज्य मजूर फेडरेशनचे विद्यमान संचालक असून मदन भोसले यांचे विश्‍वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी गेली 25 वर्षे पक्षपातळीवर केलेल्या संघटनात्मक कामाच्या जोरावर विक्रम पावसकर यांनी त्यांची निवड केली आहे.


 निवडीबद्दल त्यांचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले, भाजपचे प्रांताध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आ. मदन भोसले, माजी आ. आनंदराव पाटील, शेखर चरेगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, वाई भाजपचे तालुकाध्यक्ष रोहिदास पिसाळ, खंडाळा तालुकाध्यक्ष अनिरुद्ध गाढवे, किसनवीर कारखान्याचे संचालक, भुईंज ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, भुईंज सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, वाई, खंडाळा, महाबळेश्‍वर तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.
Previous Post Next Post