ब्लूम इंग्लिश मिडीयम स्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये इ.11 वी व 12 वी सायन्स साठी प्रवेश प्रक्रिया सुरु

स्थैर्य, फलटण : गुणवरे ता. फलटण येथील ईश्‍वर कृपा शिक्षण संस्थेचे ब्लूम इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये इयत्ता 11 वी व 12 वी सायन्स मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इयत्ता 11 वी व 12 वी सायन्स मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज घेऊन त्यासोबत लागणारी कागदपत्रे जोडून अर्ज दि. 30 आँगस्ट 2020 पर्यंत दाखल करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


गतवर्षीपासून ब्लूम इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर कॉलेज गुणवरे येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी 11 वी सायन्स चा वर्ग चालू केला आहे. या ज्युनियर कॉलेज मध्ये सुसज्ज व प्रशस्त प्रयोग शाळा असून उत्तम दर्जाचे चांगले शिक्षक या ठिकाणी असल्याने विद्यार्थ्यांचा कल चांगल्या प्रकारे आहे, असे संस्थेच्यावतीने सांगण्यात आले.

Previous Post Next Post