सोन्याचे दागिने चोरणाऱ्या तीन चोरट्यांचा बोरगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या

 स्थैर्य, सातारा, दि. १९ : मत्त्यापूर (ता. सातारा) येथून दोन लाख रूपयांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या तीन चोरट्यांना बोरगाव पोलिसांनी अटक केली. त्यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मत्त्यापूर येथील वंदना शंकर घोरपडे यांच्या राहत्या घरातून अनोळखी चोरट्यांनी सुमारे दोन लाख रूपयांचे सोन्याचे दागिने पळविले होते. ही घटना फेब्रुवारी महिन्यात घडली होती. त्यानंतर बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ,  पोलिस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर व त्यांच्या पथकाने या चोरीचा कसून तपास केला. संबंधित चोरटे हे अाज बोरगाव पोलिस ठाण्याच्या परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या वेळी पोलिस पथकाने सापळा लावून संशयिताना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


मयूर विलास ननावरे ( वय 24, रा. विसावानाका, मूळ करंजे, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. अन्य दोघे चोरटे अल्पवयीन आहेत. पोलिसांच्या तपास पथकात मनोहर सुर्वे, स्वप्नील माने, किरण निकम, विजय सांळुखे, विशाल जाधव, प्रकाश वाघ या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधिक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.