सातार्‍यात घरफोडी, 16 हजारांचा ऐवज लंपास

 


स्थैर्य, सातारा, दि. 25 : धस कॉलनी, मंगळवार पेठ येथे अज्ञात चोरट्यांनी एका घराचा कडी-कोयंडा तोडून कपाटातील 16 हजारांचे दगिने लंपास केले.


याबाबत विजय रतनसिंह राजेमहाडिक यांनी दिलेल्या शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की, ते धस कॉलनी, मंगळवार पेठेत भाड्याच्या घरात राहतात. दि. 22 रोजी सकाळी 11.15 ते दि. 24 रोजी सायंकाळी 7.45 या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा अज्ञात चेारट्यांनी तोडून घरात प्रवेश केला. या चोरट्यांनी बेडरुममधील कपाटातील लॉकरमधून 16 हजार 700 रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला असून तपास हवालदार कदम करत आहेत.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya