प्रविण तरडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; आर.पी.आय.ची मागणी

स्थैर्य, फलटण : सिनेअभिनेते व दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी संविधानाच्या प्रतिकृतीवर गणपतीची मूर्ती बसवून संविधानाचा अपमान केला आहे. त्यांची ही कृती निदंनीय असून त्यांनी राष्ट्रीय संपत्तीचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

सदर मागणीचे निवेदन प्रभारी तहसिलदार आर.सी.पाटील यांना देण्यात आले असून यावेळी जिल्हा सचिव विजय येवले, जिल्हा सरचिटणीस मुन्ना शेख, पश्‍चिम महाराष्ट्र संघटक मधुकर काकडे, जिल्हा सदस्य राजू मारुडा, फलटण तालुका अध्यक्ष संजय निकाळजे, फलटण शहराध्यक्ष लक्ष्मण अहिवळे, उपाध्यक्ष तेजस काकडे, फलटण तालुका उपाध्यक्ष सतिश अहिवळे, फलटण शहर उपाध्यक्ष अमित येवले, प्रविण शेळके, कार्याध्यक्ष सागर गायकवाड, फलटण तालुका सचिव दिपक अहिवळे, फलटण शहर प्रमुख रणजित माने, सचिव बापू काकडे, खजिनदार निलेश अहिवळे, आनंद काकडे, संघटक नाना लोंढे, फलटण तालुका संघटक किशोर अहिवळे, युथ शहराध्यक्ष सागर लोंढे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya