स्वातंत्र्य दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

 स्थैर्य, सातारा, दि. 12 :  स्वातंत्र्य दिनाचा 73 वा वर्धापन दिन शनिवार दि. 15 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 9.05 वा. जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रांगणात राष्ट्रध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम सातारा जिल्ह्याचे  पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते   होणार आहे. या  कार्यक्रमास सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी  केले  आहे.


तसेच मुख्य शासकीय समारंभास कोरोना विषाणूच्या संसर्गाचा पार्श्वभूमी व वस्तूस्थिती, सावधगिरीच्या उपाययोजना (कोविड- 19)  विचारात घेता. नागरिकांनी सहभाग घ्यावा यासाठी दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.35 ते 9.35 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा व इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ करण्यात येवू नये. तथापि इतर शासकीय कार्यालयात अथवा संस्थेचा त्या दिवशी ध्वजारोहण समारंभ करावयाचा असेल तर तो त्या दिवशी सकाळी 8.35 पूर्वी किंवा 9.35 वा. नंतर करावा, असे आवाहनही  जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.