सातारा जिल्ह्यात कोरोनाचे द्विशतक; आणखी ४ दगावले
स्थैर्य, सातारा, दि. ०१ : सातारा जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाचे 'स्फोट' होऊ लागले असून ते पाहून जिल्हावासीयांना धडकी भरत आहे. जिल्ह्यात शुक्रवारी रात्री आतापर्यंतच्या उच्चांकी २०१ रूग्णांची वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४०५० वर गेला आहे. तर रात्रीपासून सातारा, कराड, फलटण व वाई तालुक्यातील प्रत्येकी १ अशा एकूण ४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

नव्याने वाढलेल्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये ● वाई तालुक्यातील ३२, ● कराड तालुक्यातील ३३, ● खंडाळा तालुक्यातील ३४, ● सातारा तालुक्यातील ३५, ● कोरेगाव तालुक्यातील ९, ● खटाव तालुक्यातील ३, ● फलटण तालुक्यातील १७, ● महाबळेश्वर तालुक्यातील ९, ● जावली तालुक्यातील २२, ● पाटण तालुक्यातील ८ बाधितांचा समावेश आहे. आजअखेर जिल्ह्यात २८ हजार ४२५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये ४०५० पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यातील २०३६ जण कोरोनामुक्त झाले असून १३४ जण कोरोनाने दगावले आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या १८८० इतकी आहे.

४ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय येथे येवती (ता. कराड) येथील ७५ वर्षीय पुरुष व झिरपवाडी (ता. फलटण) येथील ८० वर्षीय पुरुष या दोन कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच सातारा येथील खाजगी रूग्णालयात गुरुवार पेठ येथील २५ वर्षीय कोविड बाधित पुरुषाचा व वाई येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये सोनगीरवाडी (ता. वाई) येथील ३५ वर्षीय कोविड बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

गावनिहाय वाढलेले रूग्ण
● वाई तालुका : वाई २२, खानापूर १, जांब १, बावधन १, कवठे ६, परखंदी १.
● कराड तालुका : कराड ९, सह्याद्री हॉस्पिटल २, श्रध्दा क्लिनिक ४, उंब्रज १, येवती ३, शामगाव २, कोयना वसाहत २, साजूर १, वडगाव १, मुंढे १, शेरे २, आगाशिवनगर १, म्हासोली १, कालवडे २, सैदापूर १.
● खंडाळा तालुका : शिरवळ २२, लोणंद ४, पळशी १, तळेकर वस्ती, विंग ३, भोसलेवाडी अहिरे १, शिवाजी चौक (खंडाळा) १, धनगरवाडी १, मोर्वे १.
● सातारा तालुका : रामकृष्णनगर १०, कण्हेर ९, अमरलक्ष्मी सोसायटी (संभाजीनगर) ८, शेंद्रे १, कुस ३, गोडोली ३, कामाठीपुरा १. 
● कोरेगाव तालुका : कोरेगाव १, कुमठे ७, वाघोली १.
● खटाव तालुका : थोरवेवाडी १, चितळी १, उंबर्डे १.
● फलटण तालुका : मलठण ३, मुंजवडी २, जिंती नाका ६, रामबाग कॉलनी ४, स्वामी विवेकानंदनगर १, सोमवार पेठ १.
● महाबळेश्वर तालुका : गोडवली ७, पाचगणी २.
● जावली तालुका : दुदुस्करवाडी २२.
● पाटण तालुका : सणबूर १, पाटण २, तारळे २, मल्हारपेठ १, निसरे २.

घेतलेले एकूण नमुने - २८,४२५
एकूण बाधित - ४,०५०
घरी सोडण्यात आलेले - २,०३६
मृत्यू - १३४
उपचारार्थ रुग्ण - १८८०
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.