पत्नीला कटावणीने मारहाण करणार्‍या पतीवर गुन्हा

 स्थैर्य, सातारा, दि. 17 : आवाडवाडी फाटा, दिव्यनगरी, ता. जि. सातारा येथे भांडणातून दारूच्या नशेत पतीने कटावणीने केलेल्या मारहाणीत पत्नी जखमी झाली. याबाबत माहिती अशी, सौ. पुजा विशाल साळुंखे वय 27 आणि विशाल हणमंत साळुंखे वय 30 हे पती-पत्नी आवाडवाडी फाटा येथे राहतात. दि. 15 रोजी विशाल साळुंखे हा दारुच्या नशेत होता. त्याने पत्नीला कटावणी मारण्यास हातात घेतली. यावेळी पत्नीने त्यास विरोध केला. मात्र, या भांडणात तिच्या डोक्याला कटावणी लागून जखमी झाी. याप्रकरणी पत्नी सौ. पुजा साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती विशाल साळुंखे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Previous Post Next Post