विवाहितेवर बलात्कारप्रकरणी दोघाजणांवर गुन्हा

 स्थैर्य, सातारा, दि. 12 : त्रास दूर करण्याच्या बहाण्याने तसेच पती व मुलांस जीवे मारण्याची धमकी देवून विवाहितेवर सातारा एमआयडी, सांगली येथील लॉज अशा ठिकाणी वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी दोघाजणांवर सातारा शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रमोद सदानंद लोंढे रा. करंजे, सातारा आणि मंगेश चंद्रकांत पाटील रा. दौलतनगर, सातारा अशी संशयीतांचे नावे आहेत.


याबाबत संबंधित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गावात शेतावरून वादविवाद होत असल्यामुळे ती सातारा येथे राहण्यास होती. दिनांक 5 जुलै 2007 रोजी मैत्रिणीच्या दुकानात बसली होती. त्यावेळी दुकानात प्रमोद सदानंद लोंढे रा.करंजे व मंगेश चंद्रकांत पाटील (कुर्लेकर) रा. नुने ता. जि. सातारा हे दोघे आले. मैत्रिणीने लोंढे यांना महिलेच्या त्रासबाबत सांगितले. त्यावर लोंढे यांनी प्रार्थना सभेत येण्यास सांगितले. त्याप्रमाणे महिला मैत्रिणीसमवेत दि. 07 जुलै 2007 रोजी मल्हार पेठ, सातारा येथील एका कार्यालयात गेली. तेथे लोंढे याने महिलेच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली तेव्हा तिला चक्कर आली. त्यानंतर दोन महिन्यांनी लोंढे महिलेच्या घरी आले. तेथ महिलेच्या डोक्यावर हात ठेवुन प्रार्थना केली. त्यावेळीही महिलेला चक्कर आली. यावेळी लोंढे याने तुम्ही पोस्टरपीस असे म्हणत महिलेशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यानंतर 2008 मध्ये लोंढे याने प्रार्थना कार्यक्रमांस जाण्याच्या बहाण्याने तिला एस.टीने सांगली येथे नेले. कुपवाड येथे प्रार्थना संपल्यानंतर सांगली येथे यायला रात्रीचे आठ वाजले होते. त्यामुळे महिला सांगलीतील चुलत भावाकडे जात असताना तिला जावू न देता सांगली येथील पैंजण लॉज येथे घेवून गेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. दुसर्‍या दिवशी महिला सातारा येथे एकटीच एस.टी.ने आली. यानंतर 2009 मध्ये काही कामानिमित्त एम.आय.डि.सी सातारा येथे महिला गेली होती. यावेळी लोंढे तेथे आला व तेथील एका रूममध्ये नेवून पुन्हा महिलेवर बलात्कार केला. महिलेने पोलिसांत तक्रार देणार असे सांगितले तेव्हा तुझीच बदनामी होईल, असे अशी भीती दाखवली.  


दरम्यान, 2013 मध्ये महिलेच्या पतीला वाढेफाट्याजवळ चोरट्यांनी पोटात चाकूने वार करून पैसे लुटले होते. पती सातारा हॉस्पीटल येथे उपचार घेत असताना मंगेश पाटील याने मदतीच्या बहाण्याने महिलेच्या पतीशी मैत्री केली. त्यानंतर महिलेने त्यास लोंढे याच्या गैरकृत्यबद्दल सांगितले. त्यानंतर मंगेश पाटील यांने लोंढे यांना धडा शिकवुया असे म्हणत गोड बोलुन महिलेला 2016 मध्ये हॉटेल राजदिपमधील रूममध्ये नेवून थम्सअप मधुन गुंगीचे औषध देवून बलात्कार केला. या प्रकाराने खचून जावून महिलेने औषधाचा ओव्हरडोस घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी महिलेच्या मुलीने उपचार करून तिला घरी आणले. त्यानंतरही मंगेश पाटील यांने महिलेच्या घरी येवून गळ्याला चाकू लावुन सलाईन लावलेली असताना तिच्यावर बलात्कार केला. नकार दिल्यास पती, मुलांस जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच दि.26 एप्रिल 2019 रोजी थॉयरॉईडचा त्रास होत असल्याने महिला पारंगे चौकातील लॅबमध्ये रिपोर्ट आणण्यासाठी गेली असता मंगेश पाटील कारमधून तेथे आला. महिलेला जबरदस्तीने गाडीत बसवून मारहाण करून घृणास्पद वर्तन केले. तसेच जातीचाचक शिवीगाळ व खुन करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.