जुगार खेळणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल : शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाची कारवाई
स्थैर्य, सातारा, दि. ३१ : येथील हॉटेल मराठा पॅलेसमध्ये जुगार खेळताना आढळून आलेल्या अकरा जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांना गुरुवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २ लाख ९० हजार ७०० रुपये रोख रक्कम, ८ मोबाईल, १ दुचाकी आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे लॉकडाउन सूरु आहे. अशा परिस्थितीत सातारा शहरातील एका हॉटेलमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली. गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गुन्हे प्रकटीकरण पथकाने जुगार अड्डा सुरू असणाऱ्या हॉटेल मराठा पॅलेस येथे छापा टाकला असता त्या ठिकाणी किरण विठ्ठल नलावडे रा. इंदिरानगर, विलासपूर, ता. सातारा. संजय दत्तात्रय लेवे. स्वप्निल चंद्रकांत काकडे दोघेही  रा. सर्वोदय कॉलनी, गडकर आळी, सातारा. हेमंत शिवाजी चव्हाण रा. व्यंकटपुरा, सातारा. ओमकार रामचंद्र शिंदे रा. मंगळवार तळे, सातारा. उमर निशाण मोमीन रा. गुरुवार परज, सातारा. समीर कदम शेख यादोगोपाळ पेठ, सातारा. इम्तियाज अब्दुल सय्यद रा. गुरुवार पेठ, सातारा.  अमोल जगन्नाथ चौगुले रा. मंगळवार पेठ, सातारा. धनंजय हिरालाल शिंदे रा. मोरया कॉलनी, पिरवाडी, खेड, ता. सातारा. हिरालाल शंकर शिंदे रा. आसगाव, ता. सातारा हे अकरा जण तेथे जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून २ लाख ९० हजार ७०० रुपये रोख रक्कम, ८ मोबाईल, एक दुचाकी आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
Previous Post Next Post