तिरकवाडी गावचे सुपुत्र दगुभाई शेख हे राष्ट्रपती पदकाने सन्मानित

स्थैर्य, कोळकी : फलटण तालुक्यातील तिरकवाडी गावचे सुपुत्र व उस्मानाबाद येथील स्थानिक गुन्हे शाखेमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगुभाई शेख यांनी केलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांनामानाचे असलेल्या राष्ट्रपती पथकाने सन्मानित करण्यात आलेले आहे. 


पोलीस खात्यात निरंतर उल्लेखनिय कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांस प्रतिवर्षी राष्ट्रपतींचे पोलीस पदक दिले जाते. सन 2020 या वर्षातील पदक प्राप्तकर्त्यांची यादी नुकतीच जाहीर झाली. यात स्थानिक गुन्हे शाखा, उस्मानाबादचे पोलीस निरीक्षक दगुभाई मुहंमद शेख यांचा समावेश आहे. दगुभाई शेख हे सन 1983 मध्ये पोलीस खात्यात रुजू झाले असुन सातारा, रायगड, रत्नागिरी, ठाणे शहर, नागपूर शहर यांसह महामार्ग सुरक्षा पथक व राज्य गुप्तवार्ता विभागात त्यांनी कर्तव्य बजावले आहे. सन 2014 पासुन ते उस्मानाबाद जिल्ह्यात नेमणुकीस आहेत. पोलीस खात्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना आजपर्यंत 450 हुन अधीक बक्षीसे, प्रशस्तीपत्रे मिळाली असुन सन 2014 साली ‘पोलीस महासंचालकांचे मानचिन्ह’ प्राप्त झालेले आहे.


उस्मानाबाद येथील स्थानिक गुन्हे शाखेमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगुभाई शेख हे राष्ट्रपती पथकाने सन्मानित झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. 

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya