54 नागरिकांना दिला डिस्चार्ज; 555 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात 25 जण कोरोनाबाधित


स्थैर्य, सातारा दि. 31 : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 54 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 555 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.  तसेच खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या 25 रुग्णांचे खाजगी प्रयोगशाळेत तपासणी असता ते कोरोनाबाधित असल्याची कळविले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये  ● महाबळेश्वर तालुक्यातील  बेल एअर हॉस्पीटल येथील 28 वर्षीय पुरुष, भिलार येथील 38 वर्षीय पुरुष.,
● खंडाळा  तालुक्यातील  खंडाळा ग्रामपंचायत येथील 34 वर्षीय पुरुष व 6 वर्षीय मुलगा व 8 वर्षीय मुलगी., 
● सातारा तालुक्यातील    अंगापूर वंदन येथील 55 वर्षीय पुरुष, कामेरी येथील 51 वर्षीय पुरुष व 55 वर्षीय महिला, गोजेगाव येथील 27, 23, 55 वर्षीय पुरुष व 2 वर्षीय मुलगी, कण्हेर येथील 18, 40 वर्षीय पुरुष व 24, 20,27, 65 वर्षीय महिला व 1 वर्षीय बालिका, शेळकेवाडी सातारा येथील 47 वर्षीय पुरुष, सातारा शहरातील बुधवारपेठेतील 16, 53, 49 वर्षीय पुरुष, जिहे येथील 34 वर्षीय पुरुष.,
● कराड तालुक्यातील   सुपने येथील 28 वर्षीय पुरुष, आटके येथील 34 वर्षीय पुरुष, नेरले येथील 15 वर्षीय मुलगी, कालवडे येथील 67,60 ,40 वर्षीय पुरुष, मलकापुर येथील 18, 30, 27  वर्षीय पुरुष, कराड शहरातील बुधवार पेठेतील 30 वर्षीय महिला, कृष्णा मेडीकल कॉलेज येथील 34 वर्षीय पुरुष, श्रीरामनगर कार्वे नाका येथील 50 वर्षीय महिला.,
● जावली तालुक्यातील मेढा येथील 31 वर्षीय महिला व 11 वर्षीय मुलगा, रायगाव येथील 22, 24, 31, 34,  35 वर्षीय पुरुष व 25,45,21,25 वर्षीय महिला, मोरघर येथील 30 वर्षीय महिला.,    
● पाटण तालुक्यातील नारळवाडी येथील 29 वर्षीय महिला.,
● खटाव तालुक्यातील  वडूज येथील 69 वर्षीय पुरुष.,
● वाई तालुक्यातील   बावधन येथील 59 वर्षीय महिला, शेंदुरजणे येथील 80 वर्षीय महिला व 14 वर्षीय युवक.,
● माण तालुक्यातील आंधळी येथील 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे,

खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात 25 रुग्ण कोरोनाबाधित

25 मे ते 26 जुलै या दरम्यान जिल्ह्यातील विविध खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या 25 रुग्णांचे खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोरोनाबाधित असल्याचे कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.गडीकर यांनी दिली.

याची  आकडेवारी पुढीलप्रमाणे सातारा तालुका- 16 (सातारा शहर-7), जावळी तालुका-2,  वाई तालुका-1, माण तालुका-1, पाटण तालुका-1,  खटाव तालुका-1, खंडाळा तालुका-1, इचलकरंजी (कोल्हापूर)-1,  कडेगाव (सांगली)-1

524 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

क्रांतीसिंह नाना  पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातरा येथील 37, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड  येथील 104, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील  33,  कोरेगांव येथील 2, वाई येथील 44, शिरवळ येथील 52, रायगाव 14, पानमळेवाडी 15, मायणी 54,  महाबळेश्वर 27, पाटण 58, दहिवडी 23, खावली येथे 13 व कृष्णा  हॉस्पिटल कराड येथील 79 असे एकूण  555 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले.

घेतलेले एकूण नमुने 28425
एकूण बाधित 3849
घरी सोडण्यात आलेले 2036
मृत्यू 130
उपचारार्थ रुग्ण 1683
Previous Post Next Post