जाणता राजा प्रतिष्ठान व नेहरू युवा मंडळाच्या वतीने भाडळीत फळे वाटप

स्थैर्य, फलटण : श्रावणी सोमवार निमित्त भाडळी बु. व भाडळी खु.च्या मध्यवर्ती असणाऱ्या संगमेश्वर मंदिर येथे जाणता राजा प्रतिष्ठान व नेहरू युवा मंडळाच्या वतीने दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी फळे वाटप करण्यात आली. संपूर्ण पंचक्रोशीचे श्रद्धास्थान असलेल्या संगमेश्वर मंदिर येथे जाणता राजा प्रतिष्ठान व नेहरू युवा मंडळाच्या वतीने गेली दहा वर्षे हा स्तुत्य उपक्रम राबिविला जात आहे. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहनराव डांगे, माजी सैनिक भालचंद्र डांगे, प्रशांत डांगे, पवन डांगे, धर्मेंन्द्र शिरतोडे यांच्यासह युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya