डॉ. अतुल भोसले यांच्याकडून श्रीराम मूर्तीला अभिषेक
स्थैर्य, कराड, दि. 5 : संपूर्ण जगाचे डोळे लागून राहिलेल्या ऐतिहासिक श्रीराम मंदिर उभारणी सोहळ्यास आजपासून प्रारंभ झाला. यानिमित्ताने भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी आपल्या निवासस्थानी श्रीरामाची विविधत पूजा करून अभिषेक केला तसेच रामरक्षेचे पठण करून हा ऐतिहासिक दिन साजरा केला.

संपूर्ण भारतवासीयांची धार्मिक अस्मिता असलेल्या श्रीरामाचे भव्य मंदिर कित्येक वर्षाच्या कालखंडानंतर अयोध्या नगरीत उभारले जात आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत विविधत पूजनाने व मंत्रोच्चाराच्या गजरात राम मंदिराच्या कोनशिलेचे भूमिपूजन करण्यात आले. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण वृत्तवाहिन्यांवरून करण्यात आले.

भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी आपल्या निवासस्थानी यथासांग पूजाविधी करत हा ऐतिहासिक दिवस साजरा केला. श्रीराम जन्मभूमी अयोध्या नगरीतून होत असलेल्या थेट प्रक्षेपणाचा लाभ घेत डॉ.अतुल भोसले यांनी आपल्या निवासस्थानी श्रीरामाची विधिवत पूजाअर्चा केली.मंत्रोच्चाराच्या गजरात श्रीरामाच्या मूर्तीला अभिषेक केला तसेच रामरक्षेचे पठण केले.

अनेक वर्षे प्रलंबित राहिलला श्रीराम मंदिर उभारणीचा प्रश्‍न मार्गी लागला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारतवासीयांचे हे स्वप्न पूर्णत्वास जात आहे. जगाला हेवा वाटेल असे भव्य तीर्थस्थळ राम मंदिराच्या निमित्ताने भारतात उभे राहत असून, ते संपूर्ण जगासाठी एक आदर्श श्रद्धास्थान असेल, असे मनोगत डॉ. भोसले यांनी यावेळी केले. या सर्व धार्मिक विधीचे पौराहित्य विनायक जोशी यांनी केले.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya