डॉ. जे. टी. पोळ यांचे निकोप हॉस्पिटल सील; कोव्हीड साठी रुग्णालय देत नसल्याने प्रांताधिकाऱ्यांची कारवाई

स्थैर्य, फलटण : येथील डॉ. जे. टी. पोळ यांचे निकोप हॉस्पिटल हे आज रात्री उशिरा सील केलेले आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार कोव्हीड साठी निकोप हॉस्पिटल हे अधिग्रहण करण्यात आलेले होते. परंतु ते हॉस्पिटल प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यासाठी डॉक्टर्स सहकार्य करत नसल्याने फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी निकोप हॉस्पिटल हे सील केलेले आहे.


जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सूचनेनुसार फलटण येथील डॉ. जे. टी. पोळ यांचे निकोप हॉस्पिटल हे कोव्हीडच्या रुग्णांसाठी अधिग्रहण केलेले आहे. परंतु कोव्हीडच्या ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे अश्याना निकोप हॉस्पिटल मध्ये हलवण्याबाबत हॉस्पिटल मधील डॉक्टर्स व त्यांचा स्टाफ सहकार्य करत नसल्याने सदरील पावले उचलावी लागली आहेत. आता निकोप हॉस्पिटल मधील ICU हा कोव्हीड रुग्णांसाठी अधिग्रहित केला असून तिथे लवकरच ऑक्सिजनची गरज असलेल्या कोव्हीड रुग्णांना हलवण्यात येणार आहे, अशी माहिती फलटणचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली. 

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya