न्यू इंग्लिश स्कूल ने बनवलेल्या इकोफ्रेंडली गणेश मुर्ती

  स्थैर्य, पुणे, दि. २३ : डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणेचे न्यू इंग्लिश स्कूल सातारा या शाळेने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांनी कुठेही घराच्या बाहेर न जाता घरात बसूनच  पालकांच्या साह्याने गणेश मूर्ती बनवण्याचे आवाहन करण्यात आले . तसेच यावर्षी देखील गणेश उत्सव शासकीय नियमानुसार साधेपणाने आपण केलेली गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करून  घरामध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे .कार्यशाळेमध्ये शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीतील सर्व विद्यार्थ्यांना व्हाट्सअप च्या माध्यमातून तसेच संस्थेने घेतलेल्या मायक्रोसॉफ्टच्या टीम ॲप द्वारे सामावून घेऊन ऑनलाईन पद्धतीने गेली पंधरा दिवस विद्यार्थ्यांना शाडू मातीचे गणपती बनवण्याचे अनेक सोप्या पद्धतीचे व्हिडीओ दाखवून तसेच प्रात्यक्षिके रेखाटनाद्वारे करून विद्यार्थ्यांना गणेश मूर्ती बनवण्याचे धडे दिले . संस्थेचे संस्थापक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या शताब्दी पुण्यतिथी निमित्त पर्यावरण पूरक गणेश मूर्ती विद्यार्थ्यांनी तयार करून त्यासाठी शाडूची माती असेल किंवा आपल्या आजूबाजूला परीसरातील काळी माती, पांढरी माती, लाल माती किंवा कागदाच्या लगद्यापासून देखील पाण्यात विरघळणारे माध्यमांपासून आपण गणपती बनवायचा आहे प्लॅस्टिक, थर्माकोल, प्लास्टर ऑफ पॅरिसपासून होणारे जलप्रदूषण हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना त्याचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम याची जाणीव करून देण्यात आली आहे गणपतीची आवड निर्माण करून त्यांनी गणपती तयार करण्याचे आव्हान केले आहे . अशा प्रकारे शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी  गणपती बनवून त्याचे रंगकाम देखील पूर्ण केले आणि याच  गणपतींची शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठापना करून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे . चांगले गणपती बनवणारे विद्यार्थ्यांनी एकापेक्षा अनेक गणपतीचे मूर्ती बनवून त्यातून स्व कमाई देखील  केलेली आहे  .शाळेतील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांनी  पर्यावरण पूरक गणपती बनवले . आणि यातूनच शालेय विद्यार्थ्यांनी स्व कमाई केली .शासकीय नियमांचे पालन करून साधेपणाने गणेशाची स्थापना करून गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे तसेच काही विद्यार्थ्यांनी राखी पौर्णिमेचे औचित्य साधून पर्यावरणपूरक राखी बनवले आहेत त्यासाठी विविध प्रकारचे मणी ,लोकर , कागद , पुठ्ठा, दोरा इ . साहित्य वापरून राख्या बनवून घेतले आहेत पर्यावरणपूरक यामध्ये कुठेही प्लास्टिक थर्माकोल प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर होणार नाही याची विद्यार्थ्याँना जाणिव करुन दिली आहे.


या इकोफ्रेंडली गणेश मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळे साठी शाळेचे मुख्याध्यापक सर्व पदाधिकारी तसेच इयत्ता पाचवी ते दहावी शिकवणारे सर्व विषय शिक्षक यांनी मोलाचे सहकार्य केले आहे विद्यार्थ्यांना आपल्या वर्गाच्या ग्रुप वरती व्हिडिओ पाठवून तसेच विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सुंदर गणेश मूर्ती यांचे संकलन करून त्या विद्यार्थ्यांचे कौतुक देखील करण्यात आलेले आहे त्यामुळे अनेक विद्यार्थी या कार्यशाळेच्या माध्यमातून तयार केलेले गणपतीची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सव साजरा करणार आहेत. विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून सुंदर सुंदर गणपती तर बनवले आहेतच शिवाय गणपती सजावटीसाठी देखील विद्यार्थ्यांनी विविध कागदांचा वापर करून सजावट मध्ये पानाफुलांचे आकार कापून मखरी, फुलांच्या माळा, तोरणे, इत्यादी साहित्य तयार केले आहेत.


गणपती विसर्जनासाठी देखील विद्यार्थ्यांनी बाहेर कुठेही न जाता आपण आपल्या घरामध्येच आपण तयार केलेल्या मूर्तीच विसर्जन हे बादली, पिंप, किंवा बॅलर मध्ये पाणी घेऊन करण्याचे आवाहन देखील विद्यार्थ्यांना न्यू इंग्लिश स्कूल परिवारातर्फे करण्यात आले आहे या कार्यशाळेसाठी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन टिमॲप व व्हाट्सअप च्या माध्यमातून शाळेतील कलाशिक्षक घनश्याम नवले व संदीप माळी सर यांनी बहुमोल असे मार्गदर्शन केले आहे. शाळेच्या पर्यावरणपूरक उपक्रमाबद्दल सामाजिक ,शैक्षणिक स्तरातून शाळेतील विद्यार्थ्यांचे व शालामाऊलीचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.


Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya