कणसे धाब्याच्या मालकासह मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल


 


स्थैर्य, सातारा, दि. २७ : सातारा येथील कणसे धाबा येथे पार्सल सेवा सुरू ठेवल्याप्रकरणी कणसे धाब्याच्या मालकासह मॅनेजर विरोधात तर धाब्याच्या जवळील पानशॉप सुरू ठेवल्याने पानशॉप चालकाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. २५ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास शिवराज पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या कणसे धाबा येथे पार्सल सेवा सुरू ठेवण्याच्या कारणावरून मालक आनंदराव कल्याणकर कणसे (वय ५८) रा. बारावकर नगर, सातारा मॅनेजर अभिजीत अशोक चव्हाण (वय ३५) रा. आनंदनगर सातारा यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान धाब्याच्या शेजारी असलेले पान शॉप विहित वेळेपेक्षा अधिक वेळ सुरु ठेवल्याने पानशॉप चालक बाबुराव रामचंद्र जाधव (वय ५८) रा. खिंडवाडी, ता. सातारा यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई गणेश सावता भोंग यांनी तक्रार दाखल केली आहे.Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya