महिलांना त्वरित न्याय मिळण्यासाठी स्वतंत्र न्यायालय द्या; मराठा क्रांती मोर्चाची फलटणमध्ये मागणी

स्थैर्य, फलटण : कोपर्डी, तांबडी, रोहा इत्यादी ठिकाणी महिलांवर व मुलींवर अत्याचार करून त्यांचा निर्घृण खून करण्याच्या भयंकर घटना घडल्या आहेत. अशामुळे आजही समाजात दहशत निर्माण होत आहेत. अश्या माणुसकीला कलंक फासणाऱ्या कृत करणाऱ्या नराधमांना शिक्षा ठोठवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र न्यायालय सुरु करावे व नराधमांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्याची अंमलबजावणी त्वरित करावी अशी मागमी मराठा क्रांती मोर्चा, फलटण यांच्या वतीने फलटण येथील उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्याकडे करण्यात आली. या वेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya