चेतन चौहान यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दु:ख

 स्थैर्य, मुंबई, दि. १६ : प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू व उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री चेतन चौहान यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे.


चेतन चौहान हे देशातील एक उत्तम क्रिकेटपटू व क्रिकेट प्रशासक तर होतेच परंतु ते उत्तम समाजसेवक देखील होते. लोकसभा सदस्य तसेच उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. चेतन चौहान माझे घनिष्ठ स्नेही होते. त्यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वाचे तसेच एकूण समाजाचे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाबद्दल मी आपल्या शोक संवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवित आहे, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya