पोलिसांकडे जाऊ नये म्हणून माझ्या ड्रिंक्समध्ये त्याने मिसळले होते ड्रग्स; कंगनाचा धक्कादायक खुलासा


 


स्थैर्य, मुंबई, दि. २७ : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत तिच्या वक्तव्यांसाठी कायमच चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातच अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी तर कंगनानं घराणेशाहीच्या मुद्द्यावर तिची ठाम मतं सर्वांपुढं डली. सोशल मीडियावर तिनं सातत्यानं कलाविश्वातील गटबाजी आणि घराणेशाहीच्या मुद्द्यावर आवाज उठवला. इतकंच नव्हे, तर आता तिनं याच कलाविश्वाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणला आहे. ज्यामुळं धक्काच बसत आहे.


सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुरु असणाऱ्या तपासा दरम्यान आता ड्रग्जचा वापर झाल्याची बाब समोर येत आहे. यामध्येच इंडस्ट्रीमध्ये ड्रग्जचा कशा प्रकारे वापर केला जातो याचा गौप्यस्फोट कंगनानं केला. 


सोशल मीडियाचा आधार घेत कंगनानं तिच्याच आयुष्याशी संबंधित एक घटना सांगितली. ज्यामुळं अनेकांना धक्काच बसत आहे. शिवाय बी- टाऊनमधील एका गटावकरही तिनं टीका केली आहे. नार्कोटीक्स टेस्ट झाल्यास अनेक कलाकार जेलमध्ये जातील असा खळबळजनक दावाही तिनं केला.


ट्विट करत कंगानानं लिहिलं, 'जेव्हा मी अल्पवयीन होते तेव्हा माझे मेंटर इतके भीतीदायक झाले होते की ते माझ्या ड्रिंकमध्ये ड्रग्ज मिसळायचे. म्हणजे मी पोलिसांनाकडे जाणार नाही. जेव्हा मी यशस्वी झाले आणि अनेक पार्ट्यांमध्ये जाऊ लागले तेव्हा ड्रग्ज, अय्याशी आणि माफिया जगताच्या या भयावह वास्तवाशी माझा सामना झाला.