पोलीस उपअधीक्षक अरुण सावंत यांचा सन्मान

 

उपअधिक्षक अरुण सावंत यांचा सत्कार करताना प्रा.विश्वंभर बाबर.स्थैर्य, म्हसवड दि.१७ : महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक पदक मिळाल्याबद्दल पोलीस उपअधीक्षक अरुण सावंत रा. पुळकोटी यांचा माणवासीयांतर्फे  नुकताच सन्मान करण्यात आला.


माणचे सुपुत्र व सध्या सोलापूर येथे गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत असणारे अरुण सावंत यांना नुकतेच पोलीस महासंचालक पदक प्रदान करण्यात आले. अरुण सावंत गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक असून त्यांच्याकडे उपाधीक्षक मुख्यालय असा अतिरिक्त पदभार आहे.


डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार विजेते विश्वंभर  बाबर यांनी अरुण सावंत यांच्या पुळकोटी येथील शेतावर जाऊन त्यांचा फेटा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला . या निमित्ताने मोहगिनी वृक्षलागवडी बाबतची माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली . शेतातील आंबा, सीताफळ,साग, चंदन इत्यादी फळझाडांची पाहणी करण्यात आली . यावेळी विजय सावंत, बाळासाहेब माने , निनाद पाटील , हनुमंत काळे शेठ ; राजेंद्र बनकर यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते. अरुण सावंत स्वतः कृषी पदवीधर असून त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानानी युक्त केलेली शेती दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरेल असा  विश्वास कृषीरत्न विश्वंभर  बाबर यांनी व्यक्त केला.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya