म्हसवड शहरात पती पत्नीला कोरोनाची बाधा
शहरात पुन्हा भितीचे वातावरण, बाधिताचा दांडगा जनसंपर्क, प्रशासनाची वाढणार डोकेदुखी


स्थैर्य, म्हसवड दि. ३१ : म्हसवड शहरातील महत्वाच्या ठिकाणी राहणाऱ्या पती, पत्नीचा कोरोना अहवाल हा बाधित आला असल्याने शहरात सर्वत्र एकच खळबळ उडाली असुन बाधित पुरुष हा शहरातील दांडगा जनसंपर्क असलेली व्यक्ती असल्याने शहरवासियामध्ये आपण या व्यक्तीच्या संपर्कात तर आलो नव्हतो ना अशी चर्चा सुरु आहे, तर शहरात सापडलेला बाधित पुरुष हा दांडग्या जनसंपर्काचा असल्याने त्याची हिस्ट्री तपासण्याचे अवघड काम आरोग्य यंत्रणेला करावे लागणार आहे.

म्हसवड शहराच्या महत्वाच्या ठिकाणी राहणाऱ्या या दांपत्याचा राहत्या घरासह शिक्षक कॉलनी, माळी गल्ली, शिवाजी चौक, व बसस्थानक परिसर असा मोठा संपर्क असुन यातील बाधित युवक हा ४ ते ५ दिवसांपुर्वी दहिवडी येथे कामानिमीत्त गेला असल्याची माहिती समोर येत असुन त्यातुनच त्याला कोरोनाची लागण झाली असल्याची चर्चा शहरात सुरु आहे, दि. २९ रोजी या दांपत्याला त्रास जाणवु लागल्याने म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने या दांपत्याचे स्वाईप तपासणी करीता पाठवले होते त्याचे रिपोर्ट दि. ३० रोजी रात्री उशीरा आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाले त्यामध्ये हे दोन्ही पती पत्नी बाधित असल्याचा अहवाल आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाला यामुळे शहरात मात्र एकच खळबळ उडाली आहे. यापुर्वी शहराच्या महत्वाच्या ठिकाणी राहणाऱ्या एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे, यापुर्वी मयत झालेली व्यक्ती ही नामांकित होती मात्र ती शहरात कोठेही फिरलेली नसल्याने प्रशासनाला कोरोनाची साखळी तोडण्यात यश आले होते. त्या मयत व्यक्तीच्या नंतर शहर हळुहळु पुर्वपदावर येत असताना शहरातील आणखी दोघांचे कोरोना अहवाल हे पॉझिटिव्ह आल्याने शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली असुन बाधित आलेली व्यक्ती ही शहरातील दांडगा जनसंपर्क असणारी व्यक्ती म्हणुन ओळखली जात असल्याने त्याची हिस्ट्री तपासण्याचे अवघड काम प्रशासनाला करावे लागणार आहे.

बाधिताला पुणे वाऱ्या नडल्या 
शहरात सापडलेला युवक हा एका राजकिय पक्षाचा पदाधिकारी आहे तर त्याची पत्नी शिक्षिका असुन तिचे माहेर हे म्हसवड असल्याने सासर-माहेर असा दोन्हीकडे या दांपत्याचा वावर आहे त्यामुळे संबधितांचे अहवाल हे पॉझीटिव्ह येताच आरोग्य विभागाने या दांपत्याची दोन मुली व आई, वडील यांना क्वॉरंटाईन केले आहे. तर बाधित याने काही दिवसांपुर्वी पुणे येथे पार्टनरशिप मध्ये सुरु केले असुन त्यासाठी संबधीत युवकाचे पुणे येथे येणे-जाणे होते त्यातुनच ही बाधा झाल्याची चर्चा शहरात सुरु आहे.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.