फलटणमध्ये आज दिवसभरात ४८ जणांच्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह

स्थैर्य, फलटण : दिनांक १६ ऑगस्ट २०२० रोजी घेतलेल्या SWAB चे आज दिनांक १८ ऑगस्ट २०२० रोजी अहवाल आले असून त्या मध्ये फलटण येथील मारवाड पेठ मधील ६९ वर्षीय पुरुष, २३ वर्षीय पुरुष, बुधवार पेठ येथील ५६ वर्षीय पुरुष, कसबा पेठ येथील ३४ वर्षीय महिला, तामखडा येथील २७ वर्षीय पुरुष, ३३ वर्षीय पुरुष, ४४ वर्षीय पुरुष, जिंती येथील ४४ वर्षीय पुरुष, निंभोरे येथील २५ वर्षीय पुरुष, जाधववाडी येथील ५५ वर्षीय महिला, गिरवी येथील ३२ वर्षीय पुरुष, टाकोबायचीवाडी येथील ५६ वर्षीय पुरुष, तावडी येथील ७० वर्षीय महिला असे एकूण १३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. 


या बरोबरच आज दिनांक १८ ऑगस्ट २०२० रोजी घेतलेल्या SWAB चे आज दिनांक १८ ऑगस्ट २०२० रोजीचे कोरोना अहवाल आले असून त्या मध्ये फलटण तालुक्यातील गोखळी येथील १५ वर्षीय पुरुष, १७ वर्षीय पुरुष, ४३ वर्षीय पुरुष, ७० वर्षीय पुरुष, ३२ वर्षीय महिला, ३८ वर्षीय महिला, २५ वर्षीय महिला, ८५ वर्षीय महिला, पवारवाडी येथील ५८ वर्षीय महिला, गुणवरे येथील १३ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय महिला, कोळकी येथील १ पुरुष, मलठण येथील ६५ वर्षीय महिला, ७५ वर्षीय पुरुष, कांबळेश्वर येथील ४५ वर्षीय पुरुष, राजुरी येथील ७५ वर्षीय पुरुष, नाईकबोंबवाडी येथील ६० वर्षीय पुरुष, निंभोरे येथील ५२ वर्षीय महिला, साखरवाडी येथील २ महिला, वाठार निंबाळकर येथील १ पुरुष असे एकूण २१ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. 


वरील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांची माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी आज दिनांक १८ ऑगस्ट २०२० रोजी रात्री ८.३० वाजता दिली. 


दिनांक १७ ऑगस्ट २०२० रोजी घेतलेल्या SWAB चे आज दिनांक १८ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ८.३० वाजता आलेल्या रिपोर्ट नुसार फलटण शहर व तालुक्यामध्ये १४ जणांचा कोरोना बाबतचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. त्या मध्ये मारवाड पेठ येथील ६१ वर्षीय महिला, खाटीक गल्ली येथील १५ वर्षीय पुरुष, १८ वर्षीय पुरुष, १३ वर्षीय पुरुष, १४ वर्षीय महिला, ९ वर्षांची मुलगी, ४५ वर्षीय महिला, १९ वर्षीय महिला, मलठण येथील ४० वर्षीय महिला, ४४ वर्षीय पुरुष, रिंग रोड येथील ४५ वर्षीय महिला, सोमवार पेठ येथील ३५ वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील ५५ वर्षीय महिला, विडणी येथील २२ वर्षीय महिला यांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत अशी माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी आज दिनांक १८ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ८.३० वाजता दिली.

Previous Post Next Post