जे. के. अ‍ॅग्रो एक्स्पोर्टस, आळजापूरचा सोमवारी उद्घाटन समारंभ

स्थैर्य, फलटण : निर्यातक्षम कृषी माल खरेदी विक्री व प्रक्रियेसाठी सुरू होत असलेल्या जे. के. अ‍ॅग्रो एक्स्पोर्टस, आळजापूर, ता. फलटण या संस्थेचा उद्घाटन समारंभ सोमवार, दि. 24 रोजी सकाळी 10 वाजता विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक -निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.


आळजापूर परिसरासह फलटण, कोरेगाव, खंडाळा तालुक्यातील शेतकर्‍यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जयवंत केंजळे, विश्राम जाधव, भारत जाधव यांनी केले आहे. अध्यक्षस्थान आ. दीपक चव्हाण भूषविणार असून उपविभागीय कृषी अधिकारी, फलटण भास्कर कोळेकर, प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग, बँक ऑफ महाराष्ट्र, सातारा आंचल प्रबंधक सौ. अपर्णा जोगळेकर, सरपंच आळजापूर सौ. अनिता मसुगडे, पतसंस्था फेडरेशनचे संचालक विश्वासराव धुमाळ, चार्टर्ड अकौंटंट विठ्ठलराव जाधव, पंचायत समितीच्या सदस्या सौ. प्रतिभा धुमाळ, संतकृपा उद्योगाचे विलासराव नलवडे व जि. प. सदस्य दत्ता उर्फ धैर्यशील अनपट विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.


सायंकाळी 6 वाजेपर्यंत आळजापूर, ता. फलटण येथील संस्थेच्या कार्यालयात सर्वांचे स्वागत करून त्यांना कृषी विकासासाठी कशा पद्धतीने कामकाज चालेल याविषयी माहिती देण्यात येणार आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya